इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापनेबाबत प्रस्ताव सादर करावा; अजित पवार यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2025 10:02 IST2025-10-29T10:02:34+5:302025-10-29T10:02:48+5:30

पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात उजनी धरणाचे बॅकवॉटर सुमारे ७० ते ८० किलोमीटर असून, या भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते

A proposal should be submitted for establishing a new Fisheries Science College in Indapur; Ajit Pawar's instructions | इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापनेबाबत प्रस्ताव सादर करावा; अजित पवार यांचे निर्देश

इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापनेबाबत प्रस्ताव सादर करावा; अजित पवार यांचे निर्देश

पुणे : इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याबाबत महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाने प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे नवीन मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापन करण्याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री माणिकराव कोकाटे, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन., मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू शंकरराव मगर हे मंत्रालयातून तर पुणे विभागीय अतिरिक्त आयुक्त डॉ. स्वाती देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू नितीन पाटील हे दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.

पवार म्हणाले, ‘विकसित महाराष्ट्र २०४७च्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये मत्स्यव्यवसाय विकासावर मोठ्या प्रमाणात भर देण्यात आला आहे. पुणे व सोलापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात उजनी धरणाचे बॅकवॉटर सुमारे ७० ते ८० किलोमीटर असून, या भागात मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जाते. येथे गोड्या पाण्यातील निर्यात करण्यायोग्य मासे उपलब्ध आहेत. त्यामुळे या ठिकाणी महाविद्यालय झाल्यास तेथील मत्स्यबीज संपूर्ण महाराष्ट्रात उपलब्ध करून देणे शक्य होईल. तसेच इंदापूर, बारामती, दौंड, पुरंदर या भागात मोठ्या प्रमाणात शेततळे असल्याने याचा उपयोग शेतकऱ्यांना मत्स्यपालन शेतीसाठी करता येईल.

Web Title : इंदापुर में नया मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापित करने का प्रस्ताव: अजित पवार का निर्देश

Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार ने महाराष्ट्र पशु एवं मत्स्य विज्ञान विश्वविद्यालय को इंदापुर में एक नया मत्स्य विज्ञान महाविद्यालय स्थापित करने का प्रस्ताव प्रस्तुत करने का निर्देश दिया। यह महाविद्यालय पुणे-सोलापुर क्षेत्र में मत्स्य पालन को बढ़ावा देगा, उजनी बांध के बैकवाटर और मौजूदा फार्म तालाबों का उपयोग करेगा, जिससे स्थानीय किसानों को लाभ होगा और राज्यव्यापी मछली बीज की उपलब्धता सुनिश्चित होगी।

Web Title : Propose new fisheries college in Indapur: Ajit Pawar directs.

Web Summary : Deputy Chief Minister Ajit Pawar directed Maharashtra Animal and Fishery Sciences University to propose a new fisheries college in Indapur. The college will boost fish farming in the Pune-Solapur region, utilizing Ujani dam's backwaters and existing farm ponds, benefiting local farmers and enabling statewide fish seed availability.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.