एकतर्फी प्रेमात सैराट झालेल्या प्रियकराचा प्रेयसीच्या घराबाहेर गोळीबार; पुण्यातील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 02:18 PM2024-05-19T14:18:59+5:302024-05-19T14:19:20+5:30

मला जर ती भेटली नाही तर कोणालाही सोडणार नाही. असं म्हणत प्रियकराने झाडली गोळी

A one sided lover shooting outside his girlfriend house Excitement by the incident in Pune | एकतर्फी प्रेमात सैराट झालेल्या प्रियकराचा प्रेयसीच्या घराबाहेर गोळीबार; पुण्यातील घटनेने खळबळ

एकतर्फी प्रेमात सैराट झालेल्या प्रियकराचा प्रेयसीच्या घराबाहेर गोळीबार; पुण्यातील घटनेने खळबळ

किरण शिंदे

पुणे: एकतर्फी प्रेमात सैराट झालेल्या प्रियकराने प्रेयसीच्या घराबाहेर जात गोंधळ घातला. इतकच नाही तर प्रियसीच्या बहिणी सोबत भांडण झाल्याने त्यांनी थेट पिस्तूल काढून गोळीबार केला. हा संपूर्ण प्रकार पुणे शहरातील गंजपेठेत मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात प्रियकर ऋषी बागुल आणि त्याच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १८ वर्षीय तरुणीने याप्रकरणी तक्रार दिली. 

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, शनिवारी मध्यरात्री कृषी बागुल हा प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घराजवळ आला होता. यावेळी त्याच्यासोबत त्याचा मित्रही होता. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास तो या ठिकाणी आल्याने प्रियसीची बहीण त्याला भेटण्यासाठी घराबाहेर आली होती. इतक्या रात्री घराजवळ आल्याने त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले. दरम्यान प्रेयसीने ब्लॉक केल्याचा राग आणि सुरू असलेल्या भांडणाचा राग आल्याने संतापलेल्या ऋषी याने पिस्टल काढली आणि फिर्यादीच्या बहिणीच्या दिशेने रोखून गोळी झाडली. 

सुदैवाने बंदुकीतून झाडलेली गोळी कुणालाही लागली नाही. त्यानंतर आरोपीने मला जर ती भेटली नाही तर कोणालाही सोडणार नाही अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपी आणि त्याचा मित्र फिर्यादी यांच्या राहत्या घराला बाहेरून कडी लावून निघून गेले. धन्यवाद या संपूर्ण घटनेने घाबरलेल्या फिर्यादी यांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार दिली. खडक पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Web Title: A one sided lover shooting outside his girlfriend house Excitement by the incident in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.