शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
2
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
3
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
4
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
5
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
6
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
7
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
8
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
9
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
10
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
11
संयुक्त राष्ट्रात अमेरिकेला धक्का! चीन-रशिया अन् फ्रान्सच्या तिकडीने बिघडवला ट्रम्प यांचा खेळ
12
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
13
स्मरण दिन: संप्रदायाचा समर्थ प्रचार करणारे, समर्थ-शंकराचार्यांनी दर्शन दिलेले श्रीधर स्वामी!
14
सव्वा कोटींचं सोनं, २५ लाख कॅश; सरकारी कार्यालयावर छापा, अधिकाऱ्यांच्या घरी कोट्यवधींचं घबाड
15
खरेदीदारांचं टेन्शन वाढणार? दिग्गज गुंतवणूकदार पीटर शिफ यांनी सोन्याबाबत केली भयानक भविष्यवाणी
16
'हळदीच्या वेळी शर्टच काढत नव्हता',  अशोक खरातच्या लग्नात काय घडलं होतं, सासरच्या लोकांनी सांगितलं
17
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
18
३ मुलगे, २ मुली अन् ४८ आक्षेपार्ह व्हिडीओ, लोकांच्या फोनवर धडाधड होताहेत शेअर, समोर आली धक्कादायक माहिती
19
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
20
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला पळवून केला बलात्कार; लव जिहादचा प्रकार असल्याचा पडळकरांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2023 16:56 IST

दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी अनेक संघटनांनी केली

मंचर: अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर बलात्कार करणाऱ्या जावेद मुखतार शेख (वय 22 रा. मंचर एस कॉर्नर) याच्या विरोधात मंचर पोलिसांनी बाल लैंगिक अपराध प्रतिबंधक कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी शेख याला अटक करून त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी सोळा वर्षाची असताना जावेद शेख याने 23 मार्च 2019 रोजी तिला मंचर येथून पळवून नेले. याबाबत मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर 16 मे 2023ला यातील पीडित व तिचे नातेवाईक मंचर पोलीस ठाण्यात आले. यातील आरोपी जावेद मुख्तार शेख याला पोलिसांनी 17 मे रोजी अटक केली असून सध्या आरोपी येरवडा कारागृह पुणे येथे न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. दरम्यान पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असता वैद्यकीय अधिकारी यांनी पीडितेस पुढील उपचारासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवले होते. उपचार झाल्यानंतर सदर पीडित मुलीकडे तपास करून तिचा जबाब घेतला असता जावेद मुख्तार शेख यांने सदरची मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील बलात्कार केला. तिचा जबाब व वैद्यकीय तपास अहवालाच्या अनुषंगाने पोलिसांनी बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे जावेद शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील करत आहेत. दरम्यान हा लव जिहादचा प्रकार असल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता. याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी अनेक संघटनांनी केली होती.

टॅग्स :PuneपुणेMancharमंचरGopichand Padalkarगोपीचंद पडळकरWomenमहिलाPoliceपोलिस