Navale Bridge Accident: नवले पूल परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी मैत्रीण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 13:49 IST2026-02-16T13:47:28+5:302026-02-16T13:49:26+5:30

तरुण- तरुणी रात्रीच्या सुमारास नवले पूल परिसरातून कात्रजकडे निघाले होते, त्यावेळी खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिली

A college youth riding a bike died in the Navale Pool area his fellow passenger was injured | Navale Bridge Accident: नवले पूल परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी मैत्रीण जखमी

Navale Bridge Accident: नवले पूल परिसरात दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू; सहप्रवासी मैत्रीण जखमी

पुणे : कात्रज बाह्यवळण मार्गावर नवले पूल परिसरात प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जखमी झाली. सक्षम ऊर्फ नितीन जुनावणे (१९, रा. धायरी फाटा, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. अपघातात सक्षम जुनावणेची सहप्रवासी मैत्रीण जखमी झाली. मैत्रिणीने याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि दुचाकीस्वार नितीन हे महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. १२ फेब्रुवारी रोजी रात्री पावणेदहाच्या सुमारास दुचाकीस्वार सक्षम आणि त्याची मैत्रीण नवले पूल परिसरातून कात्रजकडे निघाले होते. त्या वेळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिली. अपघातात दोघे जण जखमी झाले. गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वार सक्षम याचा रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत्यू झाला. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रॅव्हल्स बस चालकाचा शोध घेण्यात येत आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक प्रियंका निकम करीत आहेत.

Web Title : पुणे: नवले पुल दुर्घटना में कॉलेज छात्र की मौत; दोस्त घायल।

Web Summary : पुणे के नवले पुल इलाके में एक निजी ट्रैवल बस ने मोटरसाइकिल को टक्कर मार दी, जिससे एक कॉलेज छात्र की मौत हो गई। उसकी महिला मित्र घायल हो गई। पुलिस फरार बस चालक की तलाश कर रही है।

Web Title : Pune: College student dies in Navale Bridge accident; friend injured.

Web Summary : A college student died in Pune's Navale Bridge area after a private travels bus hit his motorcycle. His female friend, who was a passenger, was injured. Police are searching for the absconding bus driver.