Video: पुणे - सोलापूर महामार्गावर रात्री मालवाहतूक ट्रकला भीषण आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 10:00 IST2023-08-10T09:59:47+5:302023-08-10T10:00:31+5:30
ट्रकमध्ये असणाऱ्या टिश्यूपेपर मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान

Video: पुणे - सोलापूर महामार्गावर रात्री मालवाहतूक ट्रकला भीषण आग
इंदापूर: पुणे-सोलापूर महामार्गावरइंदापूर तालुक्यातील पळसदेव हद्दीत रात्री दोन वाजता टिशू पेपर मालवाहतूक ट्रकला भीषण आग लागली. आगीत मालवाहतूक ट्रक जळून खाक झाला आहे. ट्रकचे लायनर गरम झाल्यामुळे आग लागली होती. अग्निशमन दलाच्या दोन गाडांच्या मदतीने अखेर पहाटे पाच वाजता आग विझवण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालक -गणेश गोविंद बोडके (रा रिकोळगी ता हुमनाबाद जिल्हा बिदर) हे ट्रक घेऊन सोलापूरहून पुण्याकडे जात होते. ब्रीजच्या जवळ ट्रक चे लायनर गरम झाल्याने ट्रकला आग लागली. त्यामध्ये जीवितहानी किंवा कोणीही जखमी झाले नाही. ट्रकचे व मालाचे नुकसान मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पहाटे पाच ते साडे पाच पर्यंत दोन अग्निशामक बंब बिल्ड कंपनी भिगवण व इंदापूर नगरपरिषद यांच्या साह्याने आग विझवण्यात आली. सदरच्या घटनेच्या ठिकाणी इंदापूर पोलीस स्टेशनचा स्टाफ तात्काळ हजर झाला होता. परिस्थिती नियंत्रणात आणल्यावर वाहतूक सुरळीत करण्यात आली. आगीच्या घटनेमुळे पहाटे -महामार्गावर काही काळ लागल्या होत्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
पुणे - सोलापूर महामार्गावर रात्री मालवाहतूक ट्रकला भीषण आग #Pune#indapur#highwaypic.twitter.com/b3jeMCU4lm
— Lokmat (@lokmat) August 10, 2023