Pune Police: अवघ्या ३ दिवसांत ९५२; मद्यधुंद वाहनचालकांसह ट्रिपल सीटस्वारांवर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 18:01 IST2026-01-05T18:00:18+5:302026-01-05T18:01:40+5:30
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रस्ते अपघातांचा धोका वाढतो आणि निष्पाप नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतो

Pune Police: अवघ्या ३ दिवसांत ९५२; मद्यधुंद वाहनचालकांसह ट्रिपल सीटस्वारांवर वाहतूक पोलिसांची धडक कारवाई
पुणे : शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगाम घालण्यासाठी तसेच मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेकडून धडक मोहीम राबवण्यात आली. २ ते ४ जानेवारी दरम्यान राबवण्यात आलेल्या या मोहीमेत
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या २३२ वाहन चालकांवर मोटार वाहन अधिनियम कलम १८५ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तसेच ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या ७२० वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली असून, यातील १२१ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे रस्ते अपघातांचा धोका वाढतो आणि निष्पाप नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतो. नियमांचे काटेकोर पालन केल्यास शहरातील वाहतूक अधिक सुरक्षित, सुरळीत आणि शिस्तबद्ध राहू शकते, असे पुणे शहर वाहतूक विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, सर्व वाहनचालकांनी मोटार वाहन अधिनियमातील नियमांचे पालन करून वाहतूक व्यवस्थेस सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी केले.