शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात गणेश विसर्जनाच्या दिवशी ७ हजार पोलीस तैनात; विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जन करण्यास पूर्णत: बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 21:18 IST

संध्याकाळी सात वाजेपर्यंत मानाच्या गणपतींचे विसर्जन होणार, अमिताभ गुप्ता यांची माहिती

ठळक मुद्देशहरातील प्रमुख गणेश मंडळांनी विसर्जनावेळी शहर पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन

पुणे : गणेश विसर्जनानिमित्त येत्या रविवारी अत्यावश्यक सेवा, तसेच रेस्टॉरंट, हॉटेल वगळता अन्य सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत, तसेच पुणे शहरात ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे, असे पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षीप्रमाणे यंदाही गणेश विसर्जन मंडपातच करण्यात येणार आहे. विसर्जन घाटावर मूर्ती विसर्जन करण्यास पूर्णत: बंदी आहे, तर काही ठिकाणी फिरत्या हौदांची सोय असणार आहे. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे वाद्य वाजवणे, खेळ खेळणे, मिरवणुका काढण्यास यंदाही बंदी आहे, असे अमिताभ गुप्ता यांनी स्पष्ट केले.

शहरातील प्रमुख गणेश मंडळांनी विसर्जनावेळी शहर पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केले आहे, तसेच नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम पाळावेत. मिरवणूक सकाळी १० वाजत सुरू होईल, तर मानाच्या सर्व गणेश मंडळांच्या मूर्तींचे विसर्जन संध्याकाळी ७ वार्जपर्यंत करण्यात येणार असल्याचे अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

७  हजारांवर पोलिसांचा विसर्जनासाठी असा आहे बंदोबस्त

होमगार्ड- ४५०, एसआरपीएफ- ४ तुकड्या, दंगल विरोधी १० पथके, बॉम्ब शोधक व नाशक ८ पथके, शीघ्र कृती दल १६ पथके, सर्व पोलीस ठाण्यातंर्गत १ हजार १०० कर्मचारी, गुन्हे शाखेतील २०० कर्मचारी, विशेष शाखेतील १०० कर्मचारी, स्ट्रायविंग फोर्स १० पथके, गुन्हे शाखा आणि आर्थिक गुन्हे शाखेची  २० पथके, विशेष पोलीस अधिकारी एसपीओ १ हजार २००

टॅग्स :PuneपुणेganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सवcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस