शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यमान सभापतींसह ७ अर्जांवर हरकती!

By admin | Updated: August 14, 2015 03:18 IST

सकाळी ११ वाजता अधिकृत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली.

नारायणगाव : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज (दि. १३) झालेल्या छाननीत १८१ अर्जापैकी १७४ अर्ज वैध ठरले असून ७ अर्जांवरील निर्णय राखून ठेवण्यात आला असून, उद्या (दि. १४) सकाळी ११ वाजता अधिकृत निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती निवडणूक अधिकारी तथा प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी दिली. दरम्यान, विद्यमान सभापती संजय काळे, विद्यमान संचालक गजानन उर्फ नाना घोडे, तुळशीराम शिंदे, सीताराम खिलारी, भगवान घोलप या ५ जणांच्या उमेदवारी अर्जावर उत्पन्न जास्त असणे, लाभार्थी असणे, मुख्य उत्पन्न शेतीपासून नाही आदि कारणांवरून प्रतिस्पर्धी राजकीय विरोधकांनी छाननीच्यावेळी आक्षेप घेतला आहे. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार दिलीप मोहिते हे बाजार समितीचे संचालक असताना त्यांच्या कंपनीला कंत्राट मिळाल्याने ते लाभार्थी ठरतात म्हणून त्यांचा अर्ज बाद ठरवावा, अशी हरकत घेण्यात आली होती. आज दिवसभराचा वेळ घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी मुकुंद पवार यांनी मोहिते यांचा अर्ज नामंजूर केला. या पार्श्वभूमीवर उद्या निवडणूक अधिकारी काय निर्णय देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. छाननीतच प्रस्थापित उमेदवाराना बाहेर काढण्यासाठी विरोधकांनी चंग बांधला आहे़ छाननीच्यावेळी तक्रारदार आणि विद्यमान संचालकांनी वकीलांची फौजच उपस्थित केली होती. दोन्हीकडील म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी कल्याण पांढरे यांनी या ५ विद्यमान संचालकांचा निर्णय राखून ठेवला आहे. विद्यमान संचालकांच्यावर घेण्यात आलेलल्या हरकतीमुळे राजकीय नेत्यांची दिवसभर चांगलीच धावपळ सुरू होती.दरम्यान विद्यमान सभापती संजय काळे यांचा उमेदवारी अर्ज छाननीमध्ये वैध झाला असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली आहे. त्यामुळे छाननीतच संजय काळे यांना झटका देण्याचा प्रयत्न अयशस्वी होणार आहे .संवर्गनिहाय वाढ अर्जांची संख्या पुढीलप्रमाणे- सोसायटी गटातील सर्वसाधारण संवर्गाच्या ७ जागांसाठी ६३ अर्ज, महिला राखीव गटाच्या १२ अर्ज, इतर मागास प्रवर्ग संवर्गासाठी-१० अर्ज, भटक्या विमुक्त जाती-जमाती संवर्गासाठी ५ अर्ज, ग्रामपंचायत गटातील सर्वसाधारण संवर्गासाठी ३३ अर्ज, आर्थिक दुर्बल गटाच्या १० अर्ज, अनूसूचित जाती-जमाती गटाच्या १३ अर्ज, व्यापारी व अडते संवर्गाच्या १४ अर्ज,हमाल व मापारी गट ११ अर्ज, पणन ३ अर्ज अशा एकूण १७४ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे. (वार्ताहर)