शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौरांच्या पुतण्यावर पालिकेचा ६७ लाख खर्च

By admin | Updated: September 10, 2015 04:12 IST

उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्या पुतण्याच्या आजारपणावर महापालिकेने ६७ लाख खर्च केल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उजेडात आला आहे. पालिका प्रशासनाने बिले मंजूर

पिंपरी : उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांच्या पुतण्याच्या आजारपणावर महापालिकेने ६७ लाख खर्च केल्याचा प्रकार माहिती अधिकारातून उजेडात आला आहे. पालिका प्रशासनाने बिले मंजूर करण्यापूर्वी सर्व खर्चाला राज्य सरकारची मंजुरी घेतली नसल्याची गंभीर माहिती पुढे आली आहे. उपमहापौर वाघेरे यांचा भाऊ महापालिकेत मजूर म्हणून कार्यरत आहे. पिंपळे सौदागर येथे ७ मे २०१४ रोजी त्यांच्या मुलाचा अपघात झाला होता. त्यानंतर त्या मुलास यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात दाखल करण्याऐवजी थेरगावातील बिर्ला रुग्णालयात दाखल केले. अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी या मुलाच्या उपचारासाठी आयुक्तांनी ५ लाख ३ हजार सातशे रुपये, पंधरा दिवसांनी ६ लाख ७४ हजारांच्या खर्चाला मंजुरी दिली होती. त्यानंतर २५ मे २०१५पर्यंत तब्बल ६७ लाख ९९ हजार ७२५ रुपयांच्या खर्चाला मंजुरी दिली. या मुलाचा जून महिन्यात मृत्यू झाला. वैद्यकीय उपचारावर खर्च करताना आयुक्तांनी राज्य शासनाची मंजुरी घेणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता स्वत:च्या अधिकारात बिले मंजूर केली. अपघातानंतर संबंधित तरुणाला पालिके ऐवजी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. महापालिकेतील इतर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांवर एवढा खर्च महापालिका करणार का? असा सवाल माहिती अधिकार कार्यकर्ते सुंदर कांबळे यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी उपस्थित केला. (प्रतिनिधी)स्पीडब्रेकरने आमच्या इंजिनियर मुलाचा जीव घेतला. त्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले गेले. तो महापालिका कर्मचाऱ्याचा मुलगा आहे. कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या वैद्यकीय उपचार बिल परिपूर्ती या सदरातून मदत केली आहे. ती नियमबाह्य नाही. मुलाच्या कुटुंबीयांच्या दु:खावर मीठ चोळण्याचा प्रकार चुकीचा आहे. - प्रभाकर वाघेरे (उपमहापौर)महापालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी असणाऱ्या वैद्यकीय उपचार बिलांबाबत मंजुरीच्या तरतुदीनुसार कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांना मदत केली जाते. त्यात कोणताही दुजाभाव केला जात नाही. ज्या वेळी पेशंट उपचार घेत असतो, त्या वेळी त्यास तातडीने मदत होणे गरजेचे असते, याच भावनेतून मदत केली. - राजीव जाधव (आयुक्त, मनपा)