जागतिक साखर संग्रहालय उभारणीसाठी ४० कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:12 IST2021-03-09T04:12:15+5:302021-03-09T04:12:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कल्पनेतून पुण्यात लवकरच जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय साकार होणार ...

40 crore for setting up of World Sugar Museum | जागतिक साखर संग्रहालय उभारणीसाठी ४० कोटींचा निधी

जागतिक साखर संग्रहालय उभारणीसाठी ४० कोटींचा निधी

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या कल्पनेतून पुण्यात लवकरच जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय साकार होणार आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात यासाठी ४० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. साखर संकुलात होणाऱ्या या संग्रहालयासाठी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी संमती दर्शवली होती. संग्रहालयासाठी सुमारे ५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

वेदकाळापासून उसाचा उल्लेख आढळतो. त्यापासून गूळ तयार करण्याची कला पुढे अवगत झाले. तेव्हापासून ते आधुनिक जगातील साखर, त्यातून आलेली गुलामगिरीची प्रथा, त्याचे उच्चाटन, गोड पदार्थ म्हणून साखरेला मिळालेली मान्यता अशा बाबी संग्रहालयात असतील. साखर कारखान्याचे एक प्रतिरूपही येथे असेल. त्यातून ऊस गाळप ते साखर तयार होण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया पाहणाऱ्याच्या लक्षात येईल. साखरेसंबधीच्या जगभरातील पुस्तकांचे ग्रंथालय, साखर उद्योगातील सुरुवातीपासूनच्या व्यक्तींची विस्ताराने माहिती, सहकारी साखर कारखानदारीचा इतिहास यासाठी संग्रहालयात स्वतंत्र दालने असणार आहे. लवकरच याचे काम सुरू होणार आहे.

कोट

साखर संग्रहालयाच्या प्रस्तावाचा अंदाजपत्रकात समावेश करण्यात आला, हे स्वागतार्ह आहे. आता या प्रकल्पाला गती देता येईल. पुण्यासाठीच नव्हे तर देशासाठीही हे आदर्श संग्रहालय असेल. त्यातून पुण्याला वेगळी ओळख मिळेल.

- शेखर गायकवाड- आयुक्त, साखर

...असे असेल संभाव्य संग्रहालय

- नियोजित जागा- साखर

संकुलाजवळ, पुणे

- अंदाजे खर्च- ५० कोटी

- साखरेचा वेदकाळापासूनचा इतिहास

- साखर, भारतातील व जगभरातील

- सहकारी साखर कारखान्यांचा इतिहास

- साखर कारखान्याची छोटी प्रतिकृती, ज्यात खरोखरच साखर तयार होईल

- ऊस लागवडीपासून तोडणीपर्यंतच्या प्रतिक्रियेची माहिती

- साखरेवरच्या जगभरातील पुस्तकांचे ग्रंथालय

- साखरेपासून होणाऱ्या पदार्थांचे विक्री दालन

Web Title: 40 crore for setting up of World Sugar Museum