शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिन्यांत ३१ अपघात; ६ ठार

By admin | Updated: July 16, 2014 04:10 IST

ठेकेदाराच्या बसवरील चालकांना कसलेही प्रशिक्षण नाही, नादुरुस्त बस, समोरील वाहनचालकाच्या चुकीमुळे गेल्या तीन महिन्यांत झालेल्या पीएमपीचे ३१ अपघात झाले

मंगेश पांडे, पिंपरीठेकेदाराच्या बसवरील चालकांना कसलेही प्रशिक्षण नाही, नादुरुस्त बस, समोरील वाहनचालकाच्या चुकीमुळे गेल्या तीन महिन्यांत झालेल्या पीएमपीचे ३१ अपघात झाले असून, ६ जणांना जीव गमवावा लागला आहे. यामध्ये ठेकेदारी बसचे अपघाताचे प्रमाण अधिक आहे.सुरक्षित प्रवास म्हणून पीएमपीने प्रवास करण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, वाढत्या अपघातांमुळे प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या वर्षी एप्रिल, मे व जून या तीन महिन्यांत ३१ अपघात झाले. यात ६ जणांचा मृत्यू झाला, तर १० जण गंभीर जखमी झाले. एकूण ३१ अपघातांत ठेकेदारीच्या बसचे १९, तर खात्याच्या बसचे १२ अपघात झाले आहेत. पदोन्नतीअभावी चालकांना वर्षानुवर्षे आहे त्याच पदावर काम करावे लागते. वेळेवर स्टार्टर अथवा चेकर या पदावर पदोन्नती होत नसल्याने चालकाची क्षमता नसतानाही वाहन चालवावे लागते. पन्नाशीच्या पुढे गेल्यावर नजर कमी होणे, थकवा येणे यासह इतर व्याधी जडतात. यामुळे चालकालाही वाहन चालविणे शक्य होत नाही. या गोष्टी देखील अपघातास कारणीभूत ठरते.पीएमपी ताफ्यात असलेल्या ठेकेदारीच्या बसवर त्यांचेच चालक आहेत. ठेकेदाराकडून हे चालक नेमताना त्यांना कसलेही प्रशिक्षण दिले जात नाही. प्रवाशांनी भरलेली बस कशी चालवावी, प्रवाशांशी कसे वागावे, प्रवासी बसताना अथवा उतरताना बसचा वेग किती असावा, थांब्यावर बस कशी थांबवावी, याची माहिती नसते. केवळ किलोमीटर पूर्ण करायचे ‘टार्गेट’ या चालकांपुढे असते. यामुळे ठेकेदारीच्या बसच्या अपघातांचा आलेख वाढत आहे. ३ महिन्यांतील अपघातांवरून ठेकेदारीच्या बसच्या अपघातांची संख्या खात्याच्या बसपेक्षा अधिक आहे. पीएमपी व आरटीओच्या वतीने चालकांना प्रशिक्षण देण्यात येते. मात्र, यामध्ये सातत्य आवश्यक आहे.