जांभोरीत २८ आदिवासी जोडपी विवाहबद्ध

By Admin | Updated: May 9, 2017 03:31 IST2017-05-09T03:31:37+5:302017-05-09T03:31:37+5:30

भैरवनाथ आदिवासी तरुण मंडळ जांभोरी, सहकारमहर्षी (कै.) दत्तात्रय गोविंदराव वळसे-पाटील समाजविकास प्रतिष्ठान व राष्ट्रवादी

28 tribal couples married in Jambhore | जांभोरीत २८ आदिवासी जोडपी विवाहबद्ध

जांभोरीत २८ आदिवासी जोडपी विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
डिंभे : भैरवनाथ आदिवासी तरुण मंडळ जांभोरी, सहकारमहर्षी (कै.) दत्तात्रय गोविंदराव वळसे-पाटील समाजविकास प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने जांभोरी (ता. आंबेगाव) येथे आयोजिलेल्या मोफत सामुदायिक विवाह सोहळ्यात रविवारी एकूण २८ आदिवासी जोडपी विवाहबद्ध झाली. मंडळाचे सोहळ््याचे यंदाचे ९ वे वर्ष होते.
जांभोरी (ता. आंबेगाव) येथील भैरवनाथ आदिवासी तरुण मंडळाची सन २००९ ला स्थापना झाली. मंडळाचे स्थापनेपासून या मंडळामार्फत आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
लग्नसमारंभापूर्वी येथे सर्व नवरदेवांची एकत्रित मिरवणूक काढण्यात येते. या वेळी ढोल-ताशाबरोबरच अनेक पारंपरिक वाद्ये वाजविली जातात. या वेळी पुणे जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, माजी समाजकल्याण सभापती सुभाषराव मोरमारे, आंबेगाव तालुका पंचायत समितीचे उपसभापती नंदा सोनावले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश घोलप, माजी पं. स. उपसभापती सुभाष तळपे, पं. स. सदस्या इंदूताई लोहकरे, संजय गवारी, मयूरी शिंगाडे, सलीम तांबोळी, नायब तहसीलदार विजय केंगले, जांभोरीचे सरपंच संजय केंगले उपस्थित होते.

Web Title: 28 tribal couples married in Jambhore