२६ दिवसांनी आरोपी ताब्यात

By Admin | Updated: June 27, 2015 03:34 IST2015-06-27T03:34:34+5:302015-06-27T03:34:34+5:30

रोहन भुरुक खुनाची सुपारी देणारे चाकण येथील त्याचे मित्र व जमीन खरेदी विक्री व्यवसायातील सहकारी मुख्य

26 days after the accused detained | २६ दिवसांनी आरोपी ताब्यात

२६ दिवसांनी आरोपी ताब्यात

चाकण : रोहन भुरुक खुनाची सुपारी देणारे चाकण येथील त्याचे मित्र व जमीन खरेदी
विक्री व्यवसायातील सहकारी मुख्य सूत्रधार रोहित संपत पवार व चंद्रकांत आनंदराव मराठे ( दोघेही रा. चाकण, ता. खेड ) या फरार आरोपी मित्रांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज ( ता. २६) रात्री उशिरा दौंड तालुक्यातीलश्रीगोंदा रोडवर ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती
पोलिस उपनिरीक्षक अंकुश माने यांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन राजेंद्र भूरूक हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करीत होते.
जमिनीच्या व्यवहारातील
वादातून त्यांचे व्यवसायातील सहकारी रोहित संपत पवार व चंद्रकात आनंदराव मराठे यांनी राजेश गुप्ता व मंजय प्रसाद उर्फ शेठ यांना खुनाची सुपारी देवून पकडलेल्या खालील आरोपींकडून खून केल्याचे निष्पन्न झाले होते. (वार्ताहर)

Web Title: 26 days after the accused detained