'होम आयसोलेशन'मध्ये राहण्यासाठी २५ हजारांचा 'बॉण्ड'; प्रशासनाचा 'अमरावती पॅटर्न' लागू करण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2021 22:10 IST2021-04-07T22:09:21+5:302021-04-07T22:10:04+5:30

रुग्णांचे बिनदिक्कत बाहेर फिरणे रोखण्यासाठी शक्कल 

25,000 rupess bond to stay in 'home isolation' ; The idea of implementing the 'Amravati pattern' of the administration | 'होम आयसोलेशन'मध्ये राहण्यासाठी २५ हजारांचा 'बॉण्ड'; प्रशासनाचा 'अमरावती पॅटर्न' लागू करण्याचा विचार

'होम आयसोलेशन'मध्ये राहण्यासाठी २५ हजारांचा 'बॉण्ड'; प्रशासनाचा 'अमरावती पॅटर्न' लागू करण्याचा विचार

पुणे : शहरातील हजारो रुग्ण सध्या गृह विलगिकरणात राहून उपचार घेत आहेत. मात्र, काही महाभाग बाधित असतानाही बिनदिक्कत बाहेर फिरत असतात. त्यामुळे इतरांना संसर्ग होण्याची भीती आहे. या रुग्णांचे बाहेर फिरणे।बंद करण्यासाठी पालिकेने शक्कल लढविली आहे. गृह विलगिकरणात राहायचे असल्यास प्रत्येकी २५ हजार रुपयांचा 'बॉण्ड' लिहून द्यावा लागणार आहे. त्यानंतर गृह विलगिकरणात राहता येणार असून या कालावधीत बाहेर पडल्यास २५ हजारांचा दंड वसूल करण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे. 

शहरातील कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. सक्रिय रूग्णांची संख्या ४५ हजारांच्या घरात गेली आहे. यातील ३८ हजार ४०१ रुग्ण गृह विलगिकरणात आहेत. तर,  ६ हजार ४२१ रुग्ण हे रुग्णालयात तसेच काेविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. गृह विलगिकरणात असलेल्या रूग्णांनी काय काळजी घ्यावी याची नियमावली तयार करण्यात आलेली आहे. सोसायट्या, इमारतींमध्ये सध्या कोरोना रुग्ण अधिक आहेत. ज्यांच्या घरात गृह विलगिकरणाची सुविधा आहे, त्यांनाच परवानगी दिली जाते. या रुग्णांवर दररोज संपर्क साधून माहिती घेतली जाते. परंतु, काही रुग्ण कोरोनाला गांभीर्याने न घेता उगाच बाहेर फिरत राहतात. याबाबतच्या तक्रारी पालिका प्रशासनाकडे येत आहेत. त्यामुळे पालिकेने ‘अमरावती पॅटर्न’ लागू करण्याचा विचार सुरू केला आहे.
---
अमरावती महापालिका गृह विलगिकरणात राहण्याची इच्छा असणाऱ्या रुग्णांकडून पंचवीस हजार रुपयांचे बॉण्ड लिहून घेते. विलगिकरण कालावधीत संबंधित रुग्ण घराबाहेर पडला तर त्याच्याकडून बॉण्डमध्ये लिहिल्याप्रमाणे २५ हजार रुपये वसुल करण्यात येतात. 
---
बॉण्ड लिहून घेतल्यानंतर विलगिकरण कालावधीत त्यांच्या घरी अचानक भेट देऊन पाहणी केली जाणार आहे. रुग्ण राहत असलेल्या साेसायटीचे अध्यक्ष, सचिव, रुग्णांचे शेजारी यांना याबाबत कल्पना दिली जाणार असून रुग्णांवर कसे लक्ष ठेवायचे याचाही आराखडा तयार केला जात आहे.

Web Title: 25,000 rupess bond to stay in 'home isolation' ; The idea of implementing the 'Amravati pattern' of the administration