शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

कारागृहात मोबाईलवरून अडीच हजार कॉल्स

By admin | Updated: January 19, 2015 01:50 IST

येरवडा कारागृहात सराईत गुन्हेगार मुन्ना दावल शेख याच्याकडे कारागृहात सापडलेल्या मोबाईलवरून अडीच हजार कॉल्स झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली

दीपक जाधव, पुणेयेरवडा कारागृहात सराईत गुन्हेगार मुन्ना दावल शेख याच्याकडे कारागृहात सापडलेल्या मोबाईलवरून अडीच हजार कॉल्स झाल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. या प्रकरणी ८ महिन्यांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर ५ तुरुंगरक्षकांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, शेखने मोबाईल आतमध्ये नेला कसा, कारागृहाच्या बराकीमध्ये मोबाईल चार्ज करता येईल अशी व्यवस्था नसताना मोबाईल चार्ज कसा केला जायचा, यांसह अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही कारागृह प्रशासनाने दिलेली नाहीत.राज्यातील सर्वात मोठे कारागृह असलेल्या येरवडा कारागृहाच्या अंडासेलमध्ये (अतिदक्षता विभाग) दक्षता विभागाने मे २०१४ मध्ये घेतलेल्या झडतीमध्ये मुन्ना शेख याच्याकडे मोबाईल आढळून आल्याचे ‘लोकमत’ने उजेडात आणले होते. कारागृहाच्या पोलीस सुरक्षाव्यवस्थेला भेदून मोबाईल आतमध्ये नेण्यात आल्याचे उजेडात आल्याने सुरक्षाव्यवस्थेचे धिंडवडे निघाले होते. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून या प्रकरणाची खात्यातंर्गत चौकशी करण्यात आली आहे.शेख याच्याकडे सापडलेल्या मोबाईलवरून अडीच हजार कॉल्स करण्यात आले आहेत. शेख हा ४ महिने येरवडा कारागृहात होता, त्यापैकी २८ दिवस त्याला अंडासेलमध्ये ठेवण्यात आले होते. अंडासेलच्या बराकीमध्ये असलेल्या स्वच्छतागृहात बसून त्याने मोबाईलवरून फोन कॉल्स केले असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याच्या टोळीतील साथीदार, नातेवाईक, मित्र यांना त्याने यावरून फोन केले आहेत. कारागृहात कैद्यांच्या बराकीमध्ये मोबाईल चार्ज करण्याकरिता विजेची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. कारागृहातील तुरुंगरक्षकाकडून मोबाईलची बॅटरी चार्ज करून शेखला पुरविण्यात आल्यामुळेच तो मोबाईल वापरू शकला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.