Pune Bus Accident: मुळशीत २ एसटीची समोरासमोर धडक; १० जण जखमी, पुणे - कोलाड महामार्गावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 15:02 IST2025-08-29T15:00:36+5:302025-08-29T15:02:11+5:30

Pune ST Bus Accident: वेगात असलेल्या श्रीवर्धन ते बीड या एसटीच्या चालकाला एका वळणावर गाडीचा ब्रेक न लागल्याने समोरच्या एसटीला धडक बसली

2 STs collide head-on in Mulshi; 10 injured, incident on Pune-Kolad highway | Pune Bus Accident: मुळशीत २ एसटीची समोरासमोर धडक; १० जण जखमी, पुणे - कोलाड महामार्गावरील घटना

Pune Bus Accident: मुळशीत २ एसटीची समोरासमोर धडक; १० जण जखमी, पुणे - कोलाड महामार्गावरील घटना

Pune ST Bus Accident:  पुणे - कोलाड महामार्गावर मुळशी धरण भागातील चाचीवली येथे दोन एसटीची समोरासमोर झालेल्या धडकेत दहा जण जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवार ( दि. २९) सकाळी नऊ वाजता घडली.
       
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीवर्धन ते बीड ही एस.टी कोकणातून पुण्याकडे तर व चिंचवड ते खेड ही एसटी पुण्याकडून कोकणाकडे निघाली होती. वेगात असलेल्या श्रीवर्धन ते बीड या एसटीच्या चालकाला एका वळणावर गाडीचा ब्रेक लागला नाही. या चालकाने ही एसटी उजव्या बाजूला घेऊन डोंगराच्या बाजूला थांबविण्याचा प्रयत्न केला. माञ याच वेळी समोरून आलेल्या चिंचवड ते खेड या एसटीची समोरासमोर धडक बसली. यावेळी दोन्ही गाडीतील मिळून १० जण  जखमी झाले. यानंतर या जखमींना मागून आलेल्या एसटीतून पौड ग्रामीण रूग्णालयात आणून उपचार करण्यात आले. मुळशीचे तहसिलदार विजयकुमार चोबे, पौडचे पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी पौड ग्रामीण रूग्णालयात येऊन जखमीची विचारपूस केली. आपत्ती व्यवस्थापन समितीचे प्रमोद बलकवडे यांनी जखमींना मदत केली.

Web Title: 2 STs collide head-on in Mulshi; 10 injured, incident on Pune-Kolad highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.