शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

१२३ विद्यार्थ्यांना प्रवेश

By admin | Updated: October 16, 2015 01:23 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश नाकारलेल्या पहिल्या फेरीतील एकूण १२३ विद्यार्थ्यांना गुरुवारी नव्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला

पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश नाकारलेल्या पहिल्या फेरीतील एकूण १२३ विद्यार्थ्यांना गुरुवारी नव्या शाळांमध्ये प्रवेश मिळाला. मात्र, अद्यापही उर्वरित विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीची वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे दुसरी फेरी सुरू होणार कधी आणि प्रवेश होऊन मुले शैक्षणिक वर्षाला सुरुवात कधी करणार, याविषयीची चिंता पालकांमध्ये आहे.शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मुलांना २५ टक्के आरक्षित जागेवर प्रवेश देणे बंधनकारक असतानाही पुण्यातील १४ शाळांनी प्रवेश देण्यास नकार दिला. त्यामुळे एकूण ४०७ मुलांच्या प्रवेशाचा प्रश्न रखडला होता. यासाठी बुधवारी व गुरुवारी दोन दिवस त्यांना पर्यायी शाळा देण्यासाठी सहकारनगर येथील राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलमध्ये प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये बुधवारी ६५ जणांना प्रवेश दिला होता, तर गुरुवारी ५८ जणांना प्रवेश देण्यात आला. तसेच, ५ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला. एकूण १२३ जणांना नवी शाळा मिळाली, तरीही शिक्षण हक्क कायद्यातील सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्या भविष्याचा प्रश्न पालक उपस्थित करीत आहेत. शिक्षण मंडळाचे प्रमुख बबन दहीफळे म्हणाले, ‘‘गुरुवारअखेरपर्यंत १२३ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला आहे, तर ५ जणांनी प्रवेश नाकारला. उर्वरित विद्यार्थ्यांसाठी दुसरी फेरी राबविण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया सुरू होईल. मात्र, शैक्षणिक सत्रातील पहिले ३ महिने उलटले तरी अद्याप पहिली फेरीच पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर, दुसरी फेरी जाहीर होऊन कधी पूर्ण होईल, याबाबत पालकांच्या मनात शंका आहे.’’दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी झालेल्या उशिराला प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक महावीर माने यांच्यासह शिक्षण विभागातील अनेक अधिकारी जबाबदार आहेत. जर विद्यार्थ्यांना ८ दिवसांत प्रवेश दिला नाही, तर शाळांबरोबरच अधिकाऱ्यांबाबतही अवमान याचिका दाखल करण्यात येईल. न्यायालयाचे आदेश असूनही तसेच याबाबत शिक्षण विभागाला वेळोवेळी निवेदने देऊनही शिक्षण विभागाने कारवाईत दिरंगाई केल्याचे दिसून आले.