पुणे शहरात १२० ते १२५ इराणी नागरिक; आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 17:02 IST2026-03-04T16:43:30+5:302026-03-04T17:02:24+5:30

शहरात ६० इराणी विद्यार्थी असून इराणी विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत संपत असल्यास ती वाढवून देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत

120 to 125 Iranian citizens in Pune city; Security increased in the wake of the Gulf war | पुणे शहरात १२० ते १२५ इराणी नागरिक; आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ

पुणे शहरात १२० ते १२५ इराणी नागरिक; आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ

पुणे: अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. शहरातील धार्मिक स्थळे, गर्दीच्या ठिकाणी पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ‘आखातातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. संवेदनशील भागात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत’, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
‘संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळून आल्यास त्वरित पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात (क्रमांक- ११२) किंवा जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा’, असे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

शहरात १२० ते १२५ इराणी नागरिक वास्तव्यास आहेत. पर्यटन, व्यवसाय,वैद्यकीय उपचार शैक्षणिक व्हिसावर इराणी नागरिक वास्तव्यास आले आहेत. काही इराणी महिलांनी भारतीय नागरिकांसोबत विवाह केले आहेत. अशा ३० महिला शहरात वास्तव्यास आहेत. शहरात ६० इराणी विद्यार्थी आहेत. इराणी विद्यार्थ्यांच्या व्हिसाची मुदत संपत असल्यास ती वाढवून देण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न केले जाणार आहेत. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने सूचना दिल्या आहेत. इराणी विद्यार्थी, तसेच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून व्हिसाची मुदत वाढवून देण्याबाबत प्रयत्न केले जाणार आहेत, अशी माहिती पुणे पोलिसांच्या विशेष शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title : पुणे: खाड़ी तनाव के बीच सुरक्षा बढ़ाई गई; ईरानी निवासियों पर निगरानी

Web Summary : खाड़ी तनाव के कारण पुणे में सुरक्षा बढ़ाई गई, 120-125 ईरानी निवासियों की निगरानी। पुलिस ने संवेदनशील क्षेत्रों में गश्त बढ़ाई और विदेश मंत्रालय के साथ समन्वय कर ईरानी छात्रों को वीजा विस्तार में सहायता की।

Web Title : Pune: Increased Security Amidst Gulf Tensions; Iranian Residents Monitored

Web Summary : Pune heightens security due to Gulf tensions, monitoring 120-125 Iranian residents. Police increase patrols, especially in sensitive areas, and assist Iranian students with visa extensions, coordinating with the Ministry of External Affairs.