महापालिकेचे डझनभर नगरसेवक आमदारकीच्या रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 07:00 AM2019-10-02T07:00:00+5:302019-10-02T11:55:51+5:30

किती नगरसेवक आमदार होणार हे लवकरच निश्चित होईल....

12 municipal pune corporators in the vidhan sabha election | महापालिकेचे डझनभर नगरसेवक आमदारकीच्या रिंगणात

महापालिकेचे डझनभर नगरसेवक आमदारकीच्या रिंगणात

googlenewsNext
ठळक मुद्देयुती-आघाडीमध्ये अनेकचे स्वप्न मात्र भंग काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील उमेदवारी देताना महापालिकेच्या नगरसेवकांचा विचार

पुणे : विधानसभा निवडणुकी सेभा-भाजपची युती आणि काँगे्रस- राष्ट्रवादी काँगे्रसची आघाडी अखेर निश्चित झाली आहे. यामुळे शहरातील अनेक नगरसेवकांचे आमदार होण्याचे स्वप्न भंग पावले असले तरी आघाडी-युतीमध्ये सुमारे डझनभर नगरसेवक यंदा आमदारकीच्या रिंगणात उतरणार आहेत. यामध्ये भाजपने आठही मतदार संघातील उमेदवार जाहीर केले असून, यापैकी तीन जागांवर महापालिकेत प्रतिनिधीत्व करणाऱ्या सदस्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील उमेदवारी देताना महापालिकेच्या नगरसेवकांचा विचार केला आहे.


    विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता अखेरचे तीन दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे बहुतेक सर्व पक्षांकडून उमेदवा-या निश्चित करण्यात येत आहे. यामध्ये भाजपच्या वतीने शहरातील आठ ही विधानसभा मतदार संघांतील उमेदवारांची नावे जाहीर केले आहेत. यामध्ये शहराच्या महापौर मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे आणि नगरसेवक सिध्दार्थ शिरोळे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेवक चेतन तुपे, अश्विनी कदम, सचिन दोडके, सुनिल टिंगरे याना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर मनसेचे गटनेते वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. कसब्यातून काँगे्रसचे गटनेते अरविंद शिंदे आणि नगरसेवक रविंद्र धंगेकर यापैकी एकाला तिकटी मिळण्याची शक्यता आहे. तर पर्वती मतदार संघातून काँगे्रसचे ज्येष्ठ सदस्य आणि नगरसेवक आबा बागुल तीव्र इच्छुक आहेत. परंतु आघाडीच्या जागा वाटपामध्ये पर्वती राष्ट्रवादीच्या वाट्याला पर्वती मतदार संघ आल्याने बागुल काय भूमिका घेणार याकडे सवार्चे लक्ष लागले आहे. यामुळे यापैकी किती नगरसेवक आमदार होणार हे लवकरच निश्चित होईल.
-----------------
यांचे स्वप्न भंगले
भाजपच्या अनेक पदाधिकारी, नगरसेवकांना गेल्या दोन अडीच वर्षांपासूनच आमदारकीची स्वप्न पडू लागली होती. त्यासाठी त्यांनी जोरदार तयारी देखील केली होती. यामध्ये कोथरुड मतदार संघातून तीव्र इच्छुक असलेले माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सुशिल मेंगडे, पर्वती विधानसभा मतदार संघातून सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, हडपसर मतदार संघातून उमेश गायकवाड, कसबा मतदार संघातून हेमंत रासणे, धीरज घाटे, नगरसेवक मारुती तुपे तीव्र इच्छुक होते. भाजपच्या वतीने या इच्छुक उमेदवारांचे महापालिकेत विविध पदे देऊन पुनर्वसन करण्याची शक्यता व्यक्त केली जाते. 
                                                                                                                            

Web Title: 12 municipal pune corporators in the vidhan sabha election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.