शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत मशिदीत अंदाधुंद गोळीबार; दोन अल्पवयीन संशयितांसह ५ जणांचा मृत्यू, पोलिसांकडून 'हेट क्राईम' घोषित
2
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
3
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
4
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
6
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
7
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
8
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
9
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
10
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
11
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
12
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
13
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
14
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
15
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
16
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
17
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
18
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
19
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
20
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीतील ११ ज्येष्ठांचा ओडीशा राज्यात १३ मार्चला अपघात; महिलेचा मृत्यू, १० जखमींवर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 19:16 IST

उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या तत्पर मदतीमुळे इतर जखमींना तातडीने वेळेवर उपचार मिळाले

बारामती: बारामतीच्या जिरायती भागातील ११ ज्येष्ठ प्रवाशांना ओडीशा राज्यात अपघाताला सामोरे जावे लागले. यामध्ये एका ज्येष्ठ महिलेचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. मात्र,उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या तत्पर मदतीमुळे इतर जखमींना तातडीने वेळेवर उपचार मिळाले. बुधवारी (दि १८) सर्व प्रवासी माळवाडी(लोणी) गावी सुखरुप परतले आहेत.

माळवाडी येथील अलका दगडे, मिना दगडे, संगीता काळोखे, कानिक़नाथ बनकर, ताराबाई बनकर, बायडाबाई लडकत, माऊली सकाटे, नामदेव काळोखे, नंदा जगताप, लिलाबाई दयाळ, हेमा लोणकर हे सर्व प्रवासी ओडीसा राज्यातील येथील श्री जगन्नाथ पुरी आदी ठिकाणी धार्मिक सहलीसाठी बारामती येथून गाडीतून गेले होते. १३ मार्च रोजी या प्रवाशांच्या गाडीला बालासोर परीसरात रात्री ८ च्या सुमारास अपघात झाला. त्यानंतर एका प्रवाशाने गावातील दगडे कुटुंबियांना संपर्क साधला. मात्र,अवघ्या काही वेळातच हा काॅल बंद झाला. यावेळी गावकऱ्यांना परत याच मोबाइलसह इतर प्रवाशांच्या मोबाइलवर रात्री ११ वाजेपर्यंत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र,समोरुन कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर रात्री उशीरा बारामती तालुका खरेदी विक्री संघाचे व्यवस्थापक  निलेश लोणकर यांना गावातील ज्ञानदेव बोरावके यांनी या अपघाताबाबतची माहिती दिली. लोणकर यांनी रात्री ११.१५ वाजता उशीरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यायलयाशी संपर्क साधला. यावेळी स्वीय सहायक सुनीलकुमार मुसळे यांच्याशी संपर्क साधत त्यांना याबाबत माहिती दिली. त्यावर परिस्थितीचे गांभीर्य पाहता उपमुख्यमंत्री कार्यालयाने अवघ्या दहा मिनिटात तातडीने या प्रवशांचे मोबाईल वरुल लोकेशनचा शोध घेत माहिती घेत मदतीसाठी सुत्रे हलविली. तसेच ‘लोकल आॅथोरीटी’च्या मदतीने जखमींना उपचारासाठी ओडीशातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळण्यास मदत झाली.

देवगिरी निवासस्थानावरून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील जखमींना मदतीसाठी लक्ष घातले. तसेच मुळ महाराष्ट्रातील आणि सध्या बालासोर येथे कार्यरत असलेले जिल्हाधिकारी मयुर सुर्यवंशी यांना देखील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने संपर्क साधण्यात आला. जिल्हाधिकारी सुर्यवंशी यांनी देखील जखमींना वेळेवर तत्पर उपचारासाठी स्वत: लक्ष घालत मदत केली. तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध केल्या. जखमींमध्ये बहुतांश प्रवाशांचे हात पाय फ्रॅक्चर झाले आहेत. मात्र,दुर्दैवाने कटक येथे उपचार सुरु असताना महिला प्रवाशी संगीता काळोखे यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव रविवारी(दि १६) भुवनेश्वर येथून विमानाने पुण्यात आणण्यात आले. त्यानंतर रात्री वेढणी (ता.फलटण)या मुळ गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Baramati Seniors' Odisha Accident: One Dead, Ten Injured, Prompt Aid

Web Summary : An accident in Odisha involving Baramati seniors resulted in one death and ten injuries. Quick assistance from the Deputy Chief Minister's office ensured timely medical care. All travelers safely returned to Malwadi on Wednesday.
टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीAccidentअपघातSenior Citizenज्येष्ठ नागरिकWomenमहिलाOdishaओदिशा