पुणे परिमंडलात १० लाख स्मार्ट वीज मीटर; ७ महिन्यांत पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 16:53 IST2026-02-17T16:52:42+5:302026-02-17T16:53:12+5:30

वीज मीटर बसवलेल्या ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळातील दिवसा वीजवापरावर ८० पैसे प्रतियुनिट सवलत दिली जात आहे

10 lakh smart electricity meters in Pune circle; Pune residents get Rs 8.5 crore discount in 7 months | पुणे परिमंडलात १० लाख स्मार्ट वीज मीटर; ७ महिन्यांत पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे परिमंडलात १० लाख स्मार्ट वीज मीटर; ७ महिन्यांत पुणेकरांना मिळाली साडेआठ कोटींची सवलत

पुणे: महावितरणपुणे परिमंडलात वीज ग्राहकांची संख्या ३९ लाख ७१ हजार इतकी असून, त्यापैकी ९ लाख ८४ हजार ग्राहकांना अत्याधुनिक टीओडी वीज मीटर बसविण्यात आले आहेत. या ग्राहकांना सकाळी ९ ते सायंकाळी ५ या काळातील दिवसा वीजवापरावर ८० पैसे प्रतियुनिट सवलत दिली जात असून, या सवलतीपोटी गेल्या सात महिन्यांत (जुलै २०२५ ते जानेवारी २०२६) पुणेकरांना ८ कोटी ६० लाखांचा लाभ मिळाला आहे. हे मीटर मोफत बसविले जात असून, ग्राहकांनी मीटर बसविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणकडून केले जात आहे.

महावितरणला लागणाऱ्या विजेत दिवसेंदिवस सौरऊर्जेचा वाटा वाढत आहे. ही वीज दिवसा मिळत असून, इतर विजेच्या तुलनेत स्वस्त आहे. या स्वस्त विजेचा फायदा महावितरण ग्राहकांना आकारल्या जाणाऱ्या वीज दरावर प्रतियुनिट ८० पैसे प्रमाणे देते. पुढील काळात ही सवलत १ रुपया प्रतियुनिटपर्यंत जाणार आहे. या सवलतीसाठी ग्राहकाकडे टीओडी मीटर असणे आवश्यक आहे.

पुणे परिमंडलात गणेशखिंड शहर मंडल, रास्तापेठ शहर मंडल व पुणे ग्रामीण मंडल अशी तीन प्रमुख कार्यालये आहेत. त्यापैकी गणेशखिंड शहर मंडलात ३ लाख ६६ हजार ८६७ टीओडी मीटर आहेत. रास्ता पेठ शहर मंडल दुसऱ्या क्रमांकावर असून, या मंडलात ३ लाख ६३ हजार ७४२ टीओडी मीटर ग्राहक आहेत. तर पुणे ग्रामीण मंडलामध्ये २ लाख ५४ हजार ३५३ टीओडी मीटर/ग्राहक आहेत. या मंडलांतील टीओडी मीटर वापरणाऱ्या ग्राहकांना सात महिन्यांमध्ये अनुक्रमे गणेशखिंड- ३ कोटी ६९ लाख ३४ हजार २ रुपये, रास्तापेठ- ३ कोटी ५३ लाख ६२ हजार ६५९ रुपये, तर पुणे ग्रामीण- १ कोटी ३७ लाख ७५ हजार ५६० रुपये सवलत मिळाली आहे.

काही ठिकाणी नवीन मीटरचे फायदे समजून न घेता ते बसविण्यापूर्वीच विरोध केला जात आहे. विजेचे बिल जास्त येत नाही तर ते अचूक असेल. ग्राहकांनी अफवांना बळी पडू नये. मीटर बसविण्यासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.- सुनील काकडे, मुख्य अभियंता, महावितरण पुणे परिमंडल

मंडल == एकूण ग्राहक == टीओडी ग्राहक == सवलत (रुपये)

गणेशखिंड शहर मंडल == १४७२२२३ == ३६६८६७ == ३,६९,३४,०७२
रास्तापेठ शहर मंडल == १५०३२२५ == ३६३७४२ == ३,५३,६२,६५९
पुणे ग्रामीण मंडल == ९९६४१५ == २५४३५३ == १,३७,७५,५६०
पुणे परिमंडल एकूण == ३९७१८६३ == ९८४९६२ == ८,६०,७२,२९१

Web Title : पुणे में स्मार्ट बिजली मीटर से 7 महीनों में करोड़ों की बचत

Web Summary : पुणे के निवासियों ने रियायती दिन के बिजली दरों के कारण स्मार्ट बिजली मीटर का उपयोग करके सात महीनों में ₹8.6 करोड़ की बचत की। पुणे में लगभग दस लाख स्मार्ट मीटर लगाए गए हैं, और अधिक छूट की उम्मीद है। निवासियों से मीटर स्थापना में सहयोग करने का आग्रह किया गया है।

Web Title : Pune Residents Save Crores with Smart Electricity Meters in 7 Months

Web Summary : Pune residents saved ₹8.6 crore in seven months using smart electricity meters due to discounted daytime electricity rates. Nearly one million smart meters have been installed in Pune, with more discounts expected. Residents are urged to cooperate with meter installation.