शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुश्रीफ काय, घरी पाणी भराही म्हणतील, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 14:09 IST

: देशात लोकशाही आहे, हसन मुश्रीफ उद्या त्यांच्या घरात येवून पाणी भरा अशीही मागणी करू शकतात. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना शनिवारी टोला लगावला.

ठळक मुद्देमुश्रीफ काय, घरी पाणी भराही म्हणतील, भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा टोला माफी मागण्याचा विषय

कोल्हापूर : देशात लोकशाही आहे, हसन मुश्रीफ उद्या त्यांच्या घरात येवून पाणी भरा अशीही मागणी करू शकतात. प्रत्येकाला बोलण्याचे स्वातंत्र्य आहे अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांना शनिवारी टोला लगावला.मंत्री छगन भुजबळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पश्चिम बंगालमधील निकालानंतर टीका केली. त्यावर पाटील यांनी भुजबळ यांचा तिखट शब्दात समाचार घेतला. मुश्रीफ यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेवून पाटील यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला होता.आमदार पाटील म्हणाले, मराठा आरक्षणाच्या गायकवाड अहवालाचे इंग्रजी भाषांतर करताना काही चुका झाल्यात का हे देखील स्पष्ट व्हायला हवे. याबाबत मी स्पष्ट भूमिका मांडली आहे. अजूनही मराठा आरक्षणाचा चेंडू राज्य सरकारच्याच कोर्टात आहे हे लक्षात घेवून राज्य सरकारने कार्यवाही करण्याची गरज आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपण चांगल्या पध्दतीने काम करू शकू असे वाटल्याने त्यांनी पहिल्यांदा सारथी आणि नंतर आण्णासाहेब पाटील महामंडळ आपल्या नियोजन विभागातंर्गत घेतले आहे. आता बघू ते काय करतात ते.गडकरींना जमले ते शासनाला का नाहीकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बंद पडलेल्या औषध कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी पाठबळ दिले आणि तेथून आता ३० हजार रेमडेसिविर इंजक्शन्सचे उत्पादन सुरू झाले. जे गडकरींना जमते ते राज्य शासनाला का जमत नाही असा सवालही पाटील यांनी उपस्थित केला.गायकवाडना एकदा तरी बोलावले काआम्ही नेमलेल्या मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष एम. जी गायकवाड यांनी याकामी इतके झोकून देवून काम केले की त्यांच्या डोळ्याची पापणी पॅरालाईज झाली. माझा एक अधिकारी त्यांना रोज रूग्णालयात नेवून आणत असे. तिथे उपचार झाले की पुन्हा ते कार्यालयात येवून काम करत होते. इतके योगदान देणाऱ्या गायकवाड यांना एकदाही चर्चेसाठी बोलवावे असे गेल्या दीड वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना का वाटलं नाही अशीही विचारणा पाटील यांनी केली.

टॅग्स :Politicsराजकारणchandrakant patilचंद्रकांत पाटीलHasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूर