शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातील प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देऊ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा शब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2021 07:52 IST

Nitin Gadkari: केंद्र सरकारमधील मराठी मंत्री महाराष्ट्राचे अ‍ॅम्बेसिडर आहेत. देशाच्या विकासाचा विचार करताना महाराष्ट्रातील प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम केंद्रातील मराठी मंत्री करतील, असे मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. 

नवी दिल्ली : केंद्र सरकारमधील मराठी मंत्री महाराष्ट्राचे अ‍ॅम्बेसिडर आहेत. देशाच्या विकासाचा विचार करताना महाराष्ट्रातील प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम केंद्रातील मराठी मंत्री करतील, असे मनोगत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. नवीन महाराष्ट्र सदनात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्या पुढचे पाऊल आणि दिल्ली अधिकारी या संस्थेतर्फे केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील नवीन मंत्र्यांचा  नितीन गडकरी यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. गडकरी यांच्याहस्ते नारायण राणे, रावसाहेब दानवे, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. नितीन गडकरी म्हणाले, “मी अपघाताने दिल्लीत आलो असलो तरी, नवीन महाराष्ट्र सदनाच्या वास्तुकरिता जमीन मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न होते. आज इथे छगन भुजबळ यांनी भव्य वास्तू उभारली आणि याच वास्तूत नवीन केंद्रीय मंत्र्यांचा सत्कार होतो आहे, याचा आनंद होतो.”  डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे दिल्लीत महाराष्ट्रातील लोकांची काळजी घेतात. त्यांच्यामुळेच दिल्लीत मराठी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आहेत. मराठी मुले उच्च पदावर यावीत, ही त्यांची तळमळ मी अनेक वर्षांपासून पाहतोय.  पुरामुळे महाराष्ट्राची स्थिती अत्यंत बिकट झाली आहे. राज्याची अलीकडे वाताहत होताना दिसते. विदेशात असलेल्या मराठी बांधवांनी महाराष्ट्राला मदत करावी, असे आवाहन यावेळी नारायण राणे यांनी केले. महाराष्ट्राचे प्रश्न मी प्राधान्याने सोडवेन, रोजगार वाढीसाठीही माझा प्रयत्न असेल, असे त्यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.  डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे आणि कपिल पाटील यांचीही भाषणे झाली. 

मंत्र्यांनी पुढाकार घ्यावाज्ञानेश्वर मुळे यांनी प्रास्ताविकात, युपीएससी करण्यासाठी जे मराठी विद्यार्थी दिल्लीत येतात, त्यांच्या निवासासाठी वसतिगृह आणि मोफत ग्रंथालय सुरू करण्याचा मानस व्यक्त करून, यासाठी सर्व मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी विनंती केली. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीMaharashtraमहाराष्ट्र