Vidhan Sabha Adhiveshan: संधी साधून रवी राणा यांनी राजदंड पळविला; भास्कर जाधव म्हणाले, बाहेर काढा...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 12:19 PM2021-07-06T12:19:41+5:302021-07-06T12:22:54+5:30

Vidhan Sabha Adhiveshan 12 Mla Suspension row: १२ आमदारांच्या निलंबनावरून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर प्रचंड गदारोळ सुरु असून भाजपाच्या प्रति विधानसभेतील माईक काढून घेण्यात आला. बाहेर ही कारवाई सुरु असताना आमदार रवी राणा यांनी सभागृहात येत संधी साधून राजदंड पळविला.

Vidhan Sabha Adhiveshan: Ravi Rana snatched the scepter; Bhaskar Jadhav said no problem | Vidhan Sabha Adhiveshan: संधी साधून रवी राणा यांनी राजदंड पळविला; भास्कर जाधव म्हणाले, बाहेर काढा...

Vidhan Sabha Adhiveshan: संधी साधून रवी राणा यांनी राजदंड पळविला; भास्कर जाधव म्हणाले, बाहेर काढा...

googlenewsNext

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: १२ आमदारांच्या निलंबनावरून विधानसभेत आणि विधानसभेबाहेर प्रचंड गदारोळ सुरु असून भाजपाच्या प्रति विधानसभेतील माईक काढून घेण्यात आला. बाहेर ही कारवाई सुरु असताना आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी सभागृहात येत संधी साधून राजदंड पळविला. यावर भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनी त्यांना सभागृहाबाहेर काढण्याचे आदेश देत काही फरक पडत नसल्याचे सांगितले. (Ravi Rana snatched Rajdand, Bhaskar jadhav said let him go from Vidhan sabha monsoon session.)

Vidhan Sabha Adhiveshan: भाजपाच्या प्रतिविधानसभेतील माईक काढून घेतले; विधानसभा अध्यक्षांचे आदेश

रवी राणा यांनी राजदंड पळविताच मार्शल कुठे आहेत, त्यांना सभागृहाबाहेर काढा असे म्हणत राजदंड पळविला म्हणून सभागृहाचे कामकाज थांबणार नाही. रवी राणा शेतकऱ्यांबाबतची चर्चा सुरु आहे. तुम्हाला सहभाग घ्यायचा असेल, तुमचे म्हणणे मांडायचे असेल तर तुम्ही थांबू शकता, असे सांगितले. 
अध्यक्षांच्या दालनात झालेली धक्काबुक्की, शिवीगाळवरून भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केले आहे. या विरोधात भाजपाने प्रतिविधानसभा भरविली आहे. तेथे स्पीकरवर भाषणबाजी केली जात आहे. गोपनिय कागद वाटले जात आहेत. माजी आमदार पुरोहीत देखील ते वाटत आहेत. यावर कारवाई करण्याची मागणी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विधानसभेत केली. यावर विधानसभा अध्यक्षांनी बाहेर वाटत असलेली कागदपत्रे, माईक जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.

Vidhan Sabha Adhiveshan: भाजपाची विधान भवनाबाहेर भरली प्रतिविधानसभा; कालीदास कोळंबकर अध्यक्ष बनले अन्...

कोरोनामुळे आमदारांना फक्त पीएला घेऊन येण्याची परवानगी आहे. माजी आमदार कसे फिरू शकतात, असा सवाल त्यांनी केला. विधानसभा अध्यक्षांना दिलेली कागदपत्रे त्यांचे आमदार वाटत आहेत. त्यांना विचारले असता ते अध्यक्षांची परवानगी घेऊनच वाटत असल्याचे सांगितले. परवानगी दाखव म्हटल्यावर ते दाखवू शकले नाहीत. ही कागदपत्रे, स्पीकर जप्त करण्याची मागणी करतानाच या कृत्यावर कारवाई करण्याची मागणी भास्कर जाधव यांनी केली होती. पृथ्वीराज चव्हाणांनी जोवर त्या प्रतिविधानसभेवर कारवाई होत नाही तोवर सभागृहाचे कामकाज थांबविण्याची मागणीक केली. तसेच अन्य एका आमदारांनी सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्याचेच निलंबन करण्याची मागणी केली आहे. यानंतर विरोधकांचा माईक काढून घेण्यात आला. 

Web Title: Vidhan Sabha Adhiveshan: Ravi Rana snatched the scepter; Bhaskar Jadhav said no problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.