शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
4
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
5
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
6
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
7
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
8
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
9
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
10
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
11
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
12
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
13
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
14
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

Video: ५०, १०० नाही ६०००! भाजपा नेत्याच्या नातीच्या एन्गेजमेंटला जनसागर लोटला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2020 11:56 AM

Corona Virus Gujarat News: कोरोना व्हायरसचे संक्रमन रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. यासाठी लोकांनी लग्न समारंभ आदी कार्यक्रमांना बंधने आणली आहेत. मात्र, भाजपाचे नेते आणि तापी जिल्ह्यातील निजार मतदारसंघाचे माजी आमदार गामित यांनी गाईडलाईन्सच्या चिंधड्या उडविल्या आहेत. 

गुजरातमध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट आली आहे. रुग्ण वाढू लागल्याने ४ मोठ्या शहरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे त्याच राज्यात सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री कांति गामित यांच्या नातीच्या एन्गेजमेंटचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये हजारो लोक जमले असून गरबा गाताना दिसत आहेत. कोरोना काळात केंद्राच्या आणि राज्याच्या गाईडलाईन्स धाब्यावर बसविल्याने आता टीका होऊ लागली आहे. 

कोरोना व्हायरसचे संक्रमन रोखण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रयत्न करत आहेत. यासाठी लोकांनी लग्न समारंभ आदी कार्यक्रमांना बंधने आणली आहेत. मात्र, भाजपाचे नेते आणि तापी जिल्ह्यातील निजार मतदारसंघाचे माजी आमदार गामित यांनी गाईडलाईन्सच्या चिंधड्या उडविल्या आहेत. 

व्हिडीओ व्हायरल होताच राज्य सरकारमध्येही खळबळ उडाली असून गृह मंत्री प्रदीप सिंह जडेजा यांनी व्हिडीओचा तपास करून कारवाईचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पोलिसांनीही कांती गामित यांना पोलिस स्थानकात बोलवून चौकशी केली आहे. गुजरातमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत. गुजरातची एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही २ लाख १० हजारवर गेली आहे. यामुळे अहमदाबाद आणि सुरतसह चार महानगरांमध्ये नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. दुसरीकडे भाजपाचेच नेते नियम मोडताना दिसत असल्याने विरोधक टीका करू लागले आहेत. 

पोलिसांवरही होणार कारवाईकांती गामित यांच्या नातीच्या साखरपुड्याचे आयोजन तापीच्या डोसवाडा गावात करण्यात आले होते. यामध्ये ६००० हून अधिक लोक गरबा खेळताना आणि त्याच्या आजुबाजुला उभे असलेले दिसत होते. या व्हिडीओत दिसणाऱ्या सर्व लोकांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच या कार्यक्रमावेळी ड्युटीवर असलेल्या पोलिसांवरही कारवाई केली जाणार आहे. 

गामित म्हणाले १५०० ते २००० लोकांना बोलावलेलेपोलिसांनी मंगळवारी गामित यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. चौकशीत त्यांनी मुलाच्या मुलीचा साखरपुडा होता. यामध्ये १५०० ते २००० लोकांच्या जेवन केले होते. मात्र, व्हॉट्सअॅपवर लोकांना माहिती मिळाल्याने मोठी गर्दी झाली. सर्व गाव आदिवासी भागात येतो. त्यामुळे त्या लोकांना आम्ही नाही म्हणू शकलो नाही. आमच्याकडून चूक झाल्याचे मान्य आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याGujaratगुजरातBJPभाजपा