गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2021 02:35 PM2021-03-21T14:35:35+5:302021-03-21T14:38:38+5:30

Sharad Pawar on Anil Deshmukh: परमबीर सिंह यांनी काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

Sharad Pawar on Anil Deshmukh: Will Home Minister Anil Deshmukh resign? Sharad Pawar made a big statement, said ... | गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले...

गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेणार का? शरद पवारांनी केले मोठे विधान, म्हणाले...

googlenewsNext

नवी दिल्ली - सचिन वाझे प्रकरणानंतर (Sachin Vaze Case) मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून झालेल्या उचलबांगडीनंतर परमबीर सिंह (Parambeer Singh) यांनी काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर विरोधकांकडून अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत शरद पवार (Sharad Pawar) यांना अनिल देशमुख यांच्या भवितव्याबाबत विचारले असता त्यांनी याबाबत मोघम उत्तर देऊन वेळ मारून नेली. (Sharad Pawar on Anil Deshmukh: Will Home Minister Anil Deshmukh resign? Sharad Pawar made a big statement, said, Anil Deshmukh's resignation will be decided by tomorrow)

अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याबाबत विचारलेल्या पत्राला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुखांवर पत्राच्या माध्यमातून केलेले आरोप गंभीर आहेत. मात्र याबाबत अनिल देशमुख यांचीही बाजू जाणून घेतली पाहिजे. त्यांच्या राजीनाम्याबाबत आम्ही सर्वांशी बोलून निर्णय घेऊ. याबाबतचा निर्णय हा उद्यापर्यंत होऊ शकेल. असे असले तरी याबाबतचा अंतिम निर्णय सर्वस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच घेतील.  

दरम्यान, परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांबाबत परमबीर सिंह म्हणाले की, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केलेले आहे. हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. परमबीर सिंह यांचे हे पत्र दोन भागात आहे. एका भागात अनिल देशमुख आणि दुसऱ्या भागात डेलकर प्रकरणाचा उल्लेख आहे. परमबीर सिंह यांनी लिहिलेले हे पत्र धक्कादायक आहे. बदली झाल्यानंतर त्यांनी हे पत्र लिहिले आहे. मात्र या पत्रावर परमबीर सिंह यांची सही नाही. तसेच पैसे कसे दिले घेतले गेले याचा उल्लेख नाही. तसेच पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना सेवेत पुन्हा घेण्याचा निर्णय हा परमबीर सिंह यांचाच होता, असा दावाही शरद पवार यांनी केला. तसेच उत्तम अधिकाऱ्याकडून या प्रकणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पवार यांनी केली.

 राज्यातील महाविकास आघाडी सरकार सरकार स्थिर आहे. परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर केलेल्या आरोपांमुळे राज्य सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले होते.

Web Title: Sharad Pawar on Anil Deshmukh: Will Home Minister Anil Deshmukh resign? Sharad Pawar made a big statement, said ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.