शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
3
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
6
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
7
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
8
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
9
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
10
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
11
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
12
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
13
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
14
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
15
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
16
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
17
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
18
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
19
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

Pandharpur Election Results : "विजयासाठी भाजपा उमेदवाराकडून गैरप्रकार,पंढरपूरमध्ये फेरनिवडणूक घ्या,’’ राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 8:21 PM

Pandharpur Election Results : पंढरपूर विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपा उमेदवार समाधान अवताडे (Samadhan awatade) आणि विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पंढरपूरमध्ये फेरनिवडणूक घ्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

मुंबई - पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Pandharpur Election Results ) भाजपाचे समाधान अवताडे यांनी अटीतटीच्या लढतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके यांना पराभूत केले होते. मात्र पंढरपूरमधील हा पराभव राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. पंढरपूर विधानसभा निवडणुकीमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपा उमेदवार समाधान अवताडे (Samadhan awatade) आणि विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांनी गैरप्रकार केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पंढरपूरमध्ये फेरनिवडणूक घ्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. ("BJP candidate Samadhan awatade misappropriates for victory, hold re-election in Pandharpur," NCP demands) 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य अॅड. नितीन माने यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रात ते लिहितात की, विधान परिषद आमगार प्रशांत परिचारक आणि भाजपा उमेदवार समाधान अवताडे यांच्या कारखान्यात कार्यरत असलेले सर्व सभासद आणि कर्मचाऱ्यांनी तीन दिवस डांबून ठेवून भाजपाला मतदान करा अन्यथा कामावरून काढून टाकू, अशा धमक्या दिल्याचा संशय निर्माण होत आहे. 

दरम्यान, असा प्रकार झाल्याचा संशय असल्याने मी पत्राद्वारे काही मागण्या करत आहे. प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे यांच्या कारखान्याच्या तसेच कार्यालयाच्या आणि घरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे. दोन्ही नेत्यांचे फोन संभाषण रेकॉर्डिंग तपासण्यात यावे. समाधान अवताडे यांच्या कंस्ट्रक्शन कंपनीचे पूर्ण ऑडिट तपासण्यात यावे. निवडणुकीदरम्यान प्रशांत परिचारक आणि समाधान अवताडे हे संचालक असलेल्या सर्व संस्था, कारखान्यातील आणि कंस्ट्रक्शन कंपनीच्या सर्व बँक खात्यांची चौकशी करावी. 

तसेच माजी न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून सदर निवडणुकीची चौकशी करण्यात यावी. तसेच समितीच्या अध्यक्षतेखाली फेरनिवडणूक पारदर्शक पद्धतीने घेण्याात यावी, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.  आमदार भारत भालके यांचे कोरोनामुळे निधन झाल्याने रिक्त झालेल्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. यामध्ये भाजपाने समाधान अवताडे तर महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसचे भगिरथ भालके यांना उमेदवारी दिली होती. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत समाधान अवताडे यांनी भगिरथ भालके यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगाला पाठवलेले पत्र 

 

टॅग्स :Pandharpur By Electionपंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक निकाल 2021pandharpur-acपंढरपूरBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस