शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 3:39 PM

सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय दिल्यानंतर भाजपाने राज्य सरकारवर टीका केली.

ठळक मुद्देभाजपा आमदार नितेश राणे यांनी सामनाच्या या अग्रलेखवरून आता महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत. तसेच, मुंबई पोलिसांनी सीबीआयला सहकार्य करावे, अशा सूचनादेखील सर्वोच्च न्यायालयाने दिल्या आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे हस्तांतरण करण्याचा निर्णय दिल्यानंतर भाजपाने राज्य सरकारवर टीका केली. तसेच, राज्य सरकारच्या भूमिकांमुळे आता मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत असल्याने थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली. यावर, आज शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून प्रत्युत्तर दिले आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी सामनाच्या या अग्रलेखवरून आता महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. नितेश राणे यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. "आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय :1.) मराठी अस्मिता, 2.) महाराष्ट्र धर्म, 3.) मराठी माणूस Night life करताना यांना मराठी माणुस दिसला नाही किंवा मराठी कलाकार दिसले नाही..तेव्हा Dino, Jacqueline, disha पाहिजे असतात..वाट लागल्यावर लगेच मराठी माणुस!," असे ट्विट करत नितेश राणे यांनी खोचक टीका केली आहे.

सुशांतच्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करावा, अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. यावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांना खटल्याच्या फाइल्स सीबीआयकडे सोपवण्याचे आणि आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, सुशांतच्या मृत्यूसंदर्भात भविष्यात नोंदविण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही प्रकरणांचीही चौकशी करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

सामनाच्या आजच्या अग्रलेखातून जोरदार टीका; महत्त्वाचे मुद्दे-- न्यायालय आणि कायद्याचा आदर करण्यात महाराष्ट्र हे पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. त्यामुळे न्याय व कायदा काय ते कोणी महाराष्ट्राला शिकवू नये व ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी व हातात राजकीय पक्षांचा झेंडा आहे अशांनी तर ते धाडस करूच नये. - कायद्याचे राज्य बदनाम करण्याचा प्रयत्न या निमित्ताने कोणी करणार असतील तर त्यांना रोखावेच लागेल. सुशांतला न्याय मिळो, नव्हे न्याय मिळायलाच पाहिजे. मात्र मुंबई पोलीस सत्य व न्यायाच्या मार्गावर असतानाच त्यांना रोखले हे बरोबर नाही.- सीबीआयकडे तपास सोपवताना सर्वोच्च न्यायालयाने हळूच फुंकर मारली, ''मुंबई पोलिसांच्या तपासात सकृत्दर्शनी काहीच चूक दिसत नाही.'' तरीही प्रामाणिकपणाची कदर न करता तपासाची सूत्रे सीबीआयकडे द्यावीत हे आश्चर्यच आहे. - देशाला राज्यघटना आणि संघराज्य देणाऱया भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र आहे. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सीबीआयला यापद्धतीने घुसवणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बहाल केलेल्या संघराज्यावरचे आक्रमण आणि त्यांनी आखून दिलेली चौकट मोडण्याचाच प्रकार आहे. - सुशांत प्रकरण सीबीआयकडे सोपवल्याची घोषणा होताच बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे अत्यानंदी चेहऱयाने बाहेर आले व राजकीय निवडणूक जिंकल्याच्या आविर्भावात पत्रकारांसमोर म्हणाले, ''ये न्याय की अन्याय पर जीत है.'' पांडे हे भाजपचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. त्यांनी हाती भाजपचा झेंडा पकडून पत्रकारांशी बोलणेच काय ते बाकी होते.- पाटण्यात जो एफआयआर नोंदवला तो बरोबर असल्याचे मत सर्वोच्च न्यायालय व्यक्त करते. कारण सुशांतचे वडील पाटण्यात राहतात. उद्या या प्रकरणातील इतर 'पात्रे' वेगळ्या राज्यांतील आहेत म्हणून आमच्या राज्यातील लोकांवर अन्याय होतोय असे ठरवून बंगालसारख्या राज्यात एफआयआर दाखल झाले तर कोलकात्याच्या पोलिसांनाही या प्रकरणाचा तपास करण्याचा अधिकार मिळणार आहे काय?

आणखी बातम्या...

जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी    

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार    

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा    

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया     

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCBIगुन्हा अन्वेषण विभागBJPभाजपाShiv Senaशिवसेना