केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 08:05 PM2020-08-19T20:05:34+5:302020-08-19T20:09:12+5:30

केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तैनातीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

centre orders immediate withdrawal of 10000 paramilitary force personnel from jammu and kashmir | केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार

Next
ठळक मुद्देकेंद्र सरकारने गेल्यावर्षी कलम 370 हटविण्याच्या निर्णयापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये या कंपन्यांची नेमणूक केली होती.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरमधून 10,000 निमलष्करी दलांना माघारी बोलविण्याचे निर्देश दिले आहेत. बुधवारी अधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली.  

केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तैनातीचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेतला असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू-काश्मीरमधील 100 सीएपीएफच्या कंपन्यांना तातडीने परत माघारी बोलविण्यात आल्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

केंद्र सरकारने गेल्यावर्षी कलम 370 हटविण्याच्या निर्णयापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये या कंपन्यांची नेमणूक केली होती. आता या कंपन्यांना परत त्यांच्या बेस ठिकाणी पाठविण्यात येणार आहे.

निर्देशांनुसार, या आठवड्यापर्यंत केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 40 कंपन्या आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीमा सुरक्षा दल आणि सशस्त्र सीमा बल यांच्या एकूण 20 कंपन्या जम्मू-काश्मीरमधून परत बोलावण्यात येणार आहेत. 

दरम्यान, एक सीएपीएफ कंपनीमध्ये 100 जवानांची कार्यक्षम क्षमता असते. यावर्षी मे महिन्यात गृह मंत्रालयाने केंद्रशासित प्रदेशातून सुमारे 10 सीएपीएफ कंपन्या मागे घेतल्या. 
 

आणखी बातम्या...

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा    

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया     

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा    

अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर    

शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय    

"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"    

Web Title: centre orders immediate withdrawal of 10000 paramilitary force personnel from jammu and kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.