शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2020 06:43 PM2020-08-19T18:43:34+5:302020-08-19T18:44:58+5:30

रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात लष्कराला लवकर पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत.

india building new road to ladakh for facilitating troop movement without observation from enemy | शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

Next

नवी दिल्ली : लडाख सीमेवर लष्कराला लवकर पोहोचण्यासाठी भारत एक नवीन रस्ता तयार करीत आहे. मनाली ते लेह दरम्यान हा रस्ता भारत तयार करत आहे.

‘एएनआय’ या वृत्तसंस्थेवर दिलेल्या माहितीनुसार, लडाखच्या अन्य क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी भारत वेगाने काम करत आहे. रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात लष्कराला लवकर पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत. एजन्सीज् मनाली ते लेहपर्यंत पर्यायी कनेक्टिव्हिटीसाठी काम करत आहेत. नवीन मार्गाद्वारे लडाखला जाण्यासाठी लष्कराचा वेळ वाचेल, असे सरकारी सूत्रांनी ‘एएनआय’  सांगितले.

आतापर्यंत लष्काराचे जवान श्रीनगरच्या जोजिलाजवळून आणि इतर मार्गांवरून लडाखचा प्रवास करत होते. मात्र, आता मनाली ते लेह हा रस्ता कमीत कमी तीन ते चार तासांची बचत करेल. तसेच, लष्कराच्या या हालचालीवर पाकिस्तान आणि चिनी सैन्य नजर ठेवू शकणार नाहीत. या मार्गाद्वारे, टँक व शस्त्रास्त्रे सहजपणे लष्काराला घेऊन जाता येऊ शकतात.

सध्याचा द्रास-कारगिल-लेह रस्ता पाकिस्तानने 1999 च्या कारगिल युद्धावेळी लक्ष्य केला होता. त्यावेळी पाकिस्तानकडून या भागावर बर्‍याच वेळा बॉम्बस्फोट झाले होते. मात्र, आता या नवीन रस्त्यांचे कामही सुरू करण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

महत्त्वाचे म्हणजे गेल्या चार महिन्यांत चीनशी सुरू असलेल्या सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने लडाख सीमेवर आपला फोकस पूर्वीपेक्षा बरेच वाढविला आहे. भारत आता दीर्घकालीन नियोजन करून या क्षेत्रात काम करत आहे. दरम्यान, लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैन्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर आता दोन्ही सैन्यांने माघार घेतली आहे.

आणखी बातम्या...

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा    

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया     

भाजपा नेते वसीम बारी यांच्या हत्येचा बदला; लष्कर-ए-तय्यबाच्या कमांडरचा खात्मा    

अशोक चव्हाण यांच्या जबाबदारीत वाढ, मुख्यमंत्र्यांचे भाजपाला चोख प्रत्युत्तर    

शिक्षकांच्या पगारात २२ टक्क्यांची वाढ, 'या' सरकारने घेतला मोठा निर्णय    

"पीएम केअर्स पारदर्शी, कोरोना संकट काळात 3100 कोटी रुपयांची मदत"    

Web Title: india building new road to ladakh for facilitating troop movement without observation from enemy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.