शहरं
Join us  
Trending Stories
1
Election Results 2026 LIVE: केरळमध्ये काँग्रेसची जोरदार मुसंडी, ९६ जागांवर घेतली आघाडी
2
तामिळनाडूत प्रस्थापितांना धक्का? अभिनेते विजय यांच्या टीव्हीकेची जोरदार मुसंडी, सुरुवातीलाच एवढ्या जागांवर मिळवली आघाडी
3
West Bengal Assembly Election 2026: प. बंगालमध्ये सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपानं गाठली शंभरी; TMC सोबत अटीतटीची लढत
4
Election Results 2026: केरळमध्ये काँग्रेस सुसाट, भाजपाचीही सात जागांवर आघाडी
5
West Bengal Assembly Election: पश्चिम बंगालमध्ये निकालाच्या आदल्या रात्री काळेबेरे? ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ पोस्टनं खळबळ!
6
बारामतीत अपेक्षेप्रमाणे सुनेत्रा पवार यांना आघाडी, तर राहुरीचा कल काय? आहे अशी अपडेट
7
बंगालमध्ये तृणमूल-भाजपामध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये कुणाला आघाडी? अशी आहे आकडेवारी
8
Tamil Nadu Elections 2026: विजय थलपती ते खुशबू सुंदर... पडद्यावरच्या कलाकारांची प्रतिष्ठा पणाला, कोण मारणार बाजी?
9
भाजपासाठी पश्चिम बंगाल ठरणार 'लास्ट फ्रंटियर'; जय-पराजयाचा परिणाम 'मिशन UP' वर पडणार?
10
Post Office ची कमाई करुन देणारी स्कीम, जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
11
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
12
'राजा शिवाजी'चं वीकेंड कलेक्शन किती? समोर आले आकडे; मराठी प्रेक्षकांची मान उंचावली
13
पश्चिम बंगालमधील या दोन मतदारसंघात 'कांटे की टक्कर', निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष
14
आजचे राशीभविष्य, ०४ मे २०२६: मिथुन, वृश्चिक, मकर राशींना धनलाभाचे संकेत; कसा असेल तुमचा दिवस?
15
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
16
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
17
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
18
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
19
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
20
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

Nitin Raut: 'अहंकाऱ्यांनो जरा शिका', मंत्री नितीन राऊत यांचा व्यंगचित्राद्वारे पंतप्रधान मोदींवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 16:10 IST

देशात आता २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचं कोरोना विरोधी लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे.

देशात आता २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांचं कोरोना विरोधी लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे. केंद्राच्या घोषणेचं सर्वस्तरातू स्वागत होत असतानाच काँग्रेसनं मोदींवर निशाणा साधला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी एक व्यंगचित्र ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघात केला आहे. 

"आमचे नेते राहुल गांधी यांनी सुरुवातीलाच रस्ता दाखवला होता. राहुल गांधी कोरोनाच्या सुरुवातीपासूनच सरकारला खबरदार करत होते. तसंच योग्य सल्लाही देत होते. अहंकाऱ्यांनो, जरा शिका", असं ट्विट नितीन राऊत यांनी केलं आहे. 

नितीन राऊत यांनी ट्विट केलेल्या व्यंगचित्रात राहुल गांधी यांचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी चालत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. यात राहुल गांधी यांनी केलेल्या एका ट्विटचाही उल्लेख करण्यात आला आहे. कोरोना लसीची खरेदी पूर्णपणे केंद्राने करावी आणि त्याचं वितरण राज्यांनी करावं तेव्हाच लस प्रत्येक गावापर्यंत सुरक्षित पद्धतीनं पोहोचेल, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. 

२१ जूनपासून देशात मोफत लसीकरणदेशात कोरोना विरोधी लसीकरणात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी राज्य सरकारांना देण्यात आली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांवर सोपविण्यात आलेली २५ टक्के लसीकरणाची जबाबदारी देखील आता केंद्र सरकार घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. येत्या २१ जूनपासून देशात १८ वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राज्यांना केंद्राकडून मोफत लस उपलब्ध करुन दिली जाईल अशी घोषणा मोदींनी केली आहे.  

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा