शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi : "४ जूननंतर गुड बाय भाजपा, गुड बाय मोदी, टाटा"; राहुल गांधींची निकालाआधीच भविष्यवाणी
2
“तुमच्या याचिकेवर CJI निर्णय घेतील”; केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस SCचा नकार
3
पोर्शे कार अपघात: 2 तासांत 15 कॉल...; बाळाच्या वडिलांनी सॅम्पल बदलण्यासाठी डॉक्टरांवर असा टाकला दबाव 
4
वाढदिवस ठरला अखेरचाच; तासगावजवळ कार कालव्यात पडून एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू
5
“४०० पार दावा विसरा, २०० जागांपुढे जात नाही, PM मोदींनी कामाचा विचार करावा”; खरगेंची टीका
6
Paytm ला अदानींचा 'आधार' मिळणार का? अहमदाबादमध्ये विजय शर्मांसोबत भेट... डील बाबत 'ही' अपडेट
7
Rajnath Singh : "केजरीवालांनी आपल्या गुरुचं ऐकलं नाही, अण्णा हजारेंनी..."; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
8
खळबळजनक! पत्नीसह कुटुंबातील 8 जणांची कुऱ्हाडीने केली हत्या, नंतर उचललं टोकाचं पाऊल
9
"मी शाहरुखच्या धर्माचा आदर करते, पण याचा अर्थ...", गौरी खानचे 'ते' विधान पुन्हा चर्चेत!
10
Opening Bell : सेन्सेक्स-निफ्टीमध्ये घसरण; Paytm च्या शेअर्समध्ये तेजी, आयनॉक्स विंड घसरला
11
Raghuram Rajan यांना राजकारणात येण्यापासून कोणी रोखलं? खुद्द माजी RBI गव्हर्नरांनी केला खुलासा
12
आजचे राशीभविष्य - 29 मे 2024; कुटुंबीयांशी संघर्ष होण्याची शक्यता, रागावर नियंत्रण ठेवा
13
"मला गायब होण्यासाठी भाग पाडलं गेलं", सोढीची प्रतिक्रिया; लवकरच खुलासा करणार
14
Success Story: रोल्स रॉयस ते हेलिकॉप्टरचे मालक, शेतकऱ्याच्या मुलानं शून्यातून उभं केलं जग
15
‘अशी’ करा स्वामी समर्थ महाराजांची मानस पूजा; होईल अपार कृपा, अशक्यही शक्य करतील स्वामी!
16
अग्रलेख: महायुतीत ठिणगी! भाजप आणि अजित पवार गटाची युती केवळ नेत्यांच्या पातळीवर
17
१२ वर्षांनी गजलक्ष्मी राजयोग: ८ राशींवर लक्ष्मीकृपा, उत्पन्न वाढ; नवी नोकरीची संधी, शुभ होईल
18
डोंबिवली स्फोट, घाटकोपर होर्डिंग, राजकोट आग.. ­नाहक जीव जातात; जबाबदार कोण?- प्रशासन!
19
अन्वयार्थ विशेष लेख: काश्मीरचे स्वर्गीय सौंदर्य आणि विकासाचा ‘तोल’
20
१ ते ५ लाखांत बालकांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; ८ महिलांसह ११ अटकेत

"...तर तुमच्या अनेक लोकांचे पडद्यामागचे काळे कारनामे बाहेर येण्यास वेळ लागणार नाही"

By कुणाल गवाणकर | Published: January 16, 2021 7:38 PM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींना इशारा

मुंबई: बलात्काराचे आरोप झालेल्या सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्ष सोमवारपासून रस्त्यावर उतरणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाटील आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. अन्यथा तुमच्या अनेक लोकांचे पडद्यामागे असलेले काळे कारनामे बाहेर यायला वेळ लागणार नाही, असा इशारा मिटकरी यांनी दिला.गायिकेनं बलात्काराचे आरोप केलेल्या धनंजय मुंडेंच्या पाठिशी उभी राहण्याची भूमिका राष्ट्रवादीनं घेतली आहे. यावरून आज चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. त्याला मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. 'धनंजय मुंडेंवरील आरोपांबद्दल चंद्रकांत पाटलांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सोमवारपासून आंदोलन करणार असल्याचं सांगितलं. सध्या भाजपला विकास, गॅस दरवाढ, शेतकरी आंदोलन, वाढते इंधन दर यावर बोलायला वेळ नाही. त्यामुळे त्यांच्याकडून कुरापती काढण्याचे प्रकार सुरू आहेत, असं मिटकरी म्हणाले.भाजपा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी सोमवारपासून आंदोलन करणार : चंद्रकांत पाटीलधनंजय मुंडेंनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात घडलेल्या सर्व घटना लोकांसमोर मांडल्या आहेत. भाजपचेच माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी स्वत: त्यांनादेखील अशाच घटनेचा सामना करावा लागल्याचं सांगितलं आहे. त्यांच्यासोबतही हनी ट्रॅपचा प्रकार घडला होता. त्यामुळे भाजपनं अनैतिकतेच्या गप्पा करू नयेत. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. नाही तर तुमच्या अनेक लोकांचे काळे कारनामे जे पडद्यामागे आहेत, ते बाहेर यायला वेळ लागणार नाही, असा इशाराच मिटकरी यांनी दिला आहे.धनंजय मुंडे यांनी स्वतः कबुली देऊन सुद्धा शरद पवार कारवाई का करत नाही? भाजपचा हल्लाबोल काय म्हणाले चंद्रकांत पाटील?शरद पवार यांनी त्यांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत चुकीच्या गोष्टींवरून आजपर्यंत कुणालाही पाठीशी घातलेले नाही. त्यांनी वेळोवेळी अशा घटनांच्या वेळी कठोर भूमिका स्वीकारलेली आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्याबाबत मात्र काल झालेल्या बैठकीत पवार यांनी राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यांनी यावेळी रेणू शर्मा यांच्याबाबत पोलीस चौकशीतून जे काही सत्य बाहेर येईल त्यानंतर कारवाई करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यांच्यावर झालेल्या आरोपाच्या चौकशी तुम्ही पोलीस सीआयडी, आणि चालत असेल तर सीबीआय कडून देखील करा. त्याबद्दल आम्हाला काही देणे घेणे नाही. मात्र, धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांच्यासोबत माझे गेल्या काही वर्षांपासून शारीरिक संबंध होते. तसेच त्यांच्यापासून मला दोन मुले आहेत. त्यांचे पालकत्व स्वीकारले असून त्यांना माझी नावे देखील दिली आहे, या सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत. परंतू, धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिल्यावर सुद्धा शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कारवाई का करत नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र याच मुद्द्यांवर आमचा आक्षेप असून मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा किंवा पवारांनी तो घ्यावा अशी आमची आग्रही भूमिका असल्याचे आहे. भारतीय समाज हा नीतिमूल्ल्यांवर चालतो असे चंद्रकांत पाटील म्हणाले. 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलDhananjay Mundeधनंजय मुंडे