शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची तयारी; 'या' दोन बड्या नेत्यांवर मोठी जबाबदारी?

By कुणाल गवाणकर | Updated: November 22, 2020 15:48 IST

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी सगळे पक्ष लागले कामाला; संघटन बांधणीवर राष्ट्रवादीचं लक्ष

मुंबई: आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भारतीय जनता पक्षानं जोरदार तयारी सुरू केली आहे. महापालिकेवर भगवा फडकणारच यावरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू झालं आहे. त्यामुळे राजकारण तापलं आहे. त्यातच राज्यात सत्तेत असलेल्या काँग्रेसनं मात्र आपण स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करत एकला चलो रेची भूमिका घेतली आहे. यानंतर आता राष्ट्रवादीनंदेखील पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीची लक्षात घेऊन राष्ट्रवादीनं पक्षाची बांधणी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. याबद्दलची माहिती पक्षाचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी दिली. 'कोरोनाचं संकट येण्यापूर्वी वांद्रे कुर्ला संकुलात शहरातील सक्रिय कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. त्याला ८ हजार कार्यकर्ते उपस्थित होते. कोरोना संकट असल्यानं सध्या मेळावे, कार्यक्रम घेता येत नाहीत. पण संघटनेच्या बांधणीवर काम सुरू आहे. पूर्ण अनलॉक झाल्यावर मेळावे, कार्यक्रम घेता येतील,' असं मलिक म्हणाले.मुंबई महापालिका निवडणुकीची जबाबदारी खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार यांच्याकडे दिली जाण्याची शक्यता आहे. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यावरही मलिक यांनी भाष्य केलं. 'निवडणुकीसाठी प्रभारी म्हणून अद्याप कोणाचीही निवड झालेली नाही. मात्र सुप्रिया सुळे, रोहित पवारांनी लक्ष घातल्यास चांगलंच असेल. त्याचा पक्षाला फायदाच होईल,' असं मलिक यांनी सांगितलं.राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी आहे. हे तीन पक्ष सरकारमध्ये एकत्र आहेत. मात्र काँग्रेसनं मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर राज्य सरकारमध्ये एकत्र असलेल्या पक्षांनी एकसंध राहायला हवं, असं विधान मलिक यांनी केलं. २०१७ मध्ये झालेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचं मोठं नुकसान झालं. त्यांच्या जागा ५२ वरून ३१ वर आल्या. तर राष्ट्रवादीचे ९ उमेदवार विजयी झाले. शिवसेनेला ८४, तर भाजपला ८२ जागा मिळाल्या होत्या. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSupriya Suleसुप्रिया सुळेnawab malikनवाब मलिकRohit Pawarरोहित पवारcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिका