शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
2
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
3
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
4
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
5
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
6
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
7
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
8
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
9
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
10
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
11
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
12
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
13
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
15
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
16
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी की उद्धव ठाकरे? महाराष्ट्र कुणाच्या कामगिरीवर अधिक समाधानी, जनतेने दिला असा कौल

By बाळकृष्ण परब | Updated: January 15, 2021 22:43 IST

Maharashtr News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारगिरीच्या जनतेने केलेल्या मूल्यमापनामधून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.

मुंबई - केंद्र सरकार आणि विविध राज्यांमधील सरकारांच्या कोरोनाकाळातील तसेच एकंदरीत कामगिरीबाबत जनतेचा कौल जाणून घेण्यासाठी करण्यात आलेल्या सर्वेमधून जनतेचा कल समोर आला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कारगिरीच्या जनतेने केलेल्या मूल्यमापनामधून आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे.

एबीपी न्यूज आणि सीव्होटरने केलेल्या सर्व्हेनुसार राज्यामध्ये सरासरी ५८ टक्के लोक मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर समाधानी दिसून आले. तर राज्यातील सरासरी ४७ टक्के लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीवर समाधानी दिसून आले. दरम्यान, देशव्यापी विचार केल्यास देशपातळीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कामगिरीवर ६६ टक्के जनतेने समाधान व्यक्त केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर किती समाधानी आहात अशा विचारण्यात आलेल्या प्रश्नाला  ४६ टक्के लोकांनी खूप समाधानी, ३२ टक्के लोकांनी समाधानी, २० टक्के लोकांनी असमाधानी असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे सरासरी ५८ टक्के लोक सरकारच्या कामगिरीवर समाधानी दिसून आले. 

तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामगिरीचा विचार केल्यास ४८ टक्के लोक खूप समाधानी, २५ टक्के लोक समाधानी, तर २६ टक्के लोक असमाधानी असल्याचे दिसून आले. त्यामुळे राज्यातील सरासरी ४७ टक्के लोक पंतप्रधान मोदींच्या कामगिरीवर समाधानी असल्याचे दिसून आले.   

दरम्यान,देशात सर्वाधिक चांगली कामगिरी करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्धव ठाकरे पाचव्या स्थानी आहेत. या यादीत ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांच्या कारभारावर ७९ टक्के लोकांनी समाधान व्यक्त केलं आहे. या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दुसऱ्या (७८ टक्के), आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी तिसऱ्या (६७ टक्के) स्थानी आहेत. तर उद्धव ठाकरेंच्या कामकाजावर ५८ टक्के लोक संतुष्ट आहेत. विशेष म्हणजे पहिल्या ५ मुख्यमंत्र्यांमध्ये भाजपचा एकही मुख्यमंत्री नाही.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रNarendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण