शहरं
Join us  
Trending Stories
1
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
2
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
3
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
4
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
5
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
6
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
7
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
8
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
9
‘दुबार’ निकाल टळला; फैसला २१ डिसेंबरलाच; नागपूर व औरंगाबाद खंडपीठाचा निर्णय
10
अग्रलेख: डिजिटल टोळ्या जेरबंद होतील? सर्वोच्च न्यायालयाची सजगता स्वागतार्ह
11
आजचे राशीभविष्य, ३ डिसेंबर २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता
12
विशेष लेख: मोदी म्हणतात, ‘काँग्रेस फुटेल!’-खरेच तसे होईल?
13
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
14
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
15
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
16
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
17
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
18
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
19
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
20
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी आठवलेंनी सुचवला पर्याय, नरेंद्र मोदींना घालणार साकडे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 17:46 IST

Ramdas Athawale : आम्ही न्यायालयाचा सन्मान राखतो मात्र राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

ठळक मुद्देक्षत्रिय मराठा समाजातील गरिबांना आपण आरक्षण मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. 

मुंबई : सर्वोच्च न्यायालयानेमराठा आरक्षण रद्द केले आहे. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. तर या मुद्द्यावरुन विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे असून यावरून आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. विरोधकांकडून राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्यात अपयशी ठरल्याची टीका सुरू केली आहे. यातच रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी उपाय सांगितला आहे. (Ramdas Athawale demands reservation for Kshatriya community)

याचबरोबर, मराठा समाजाच्या आरक्षणाची बाजू राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य पद्धतीने मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाचे आरक्षण रद्द करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आम्ही न्यायालयाचा सन्मान राखतो मात्र राज्य सरकारच्या चुकीमुळे मराठा समाजावर अन्याय झाला आहे, असे सांगत रामदास आठवले यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

'क्षत्रिय समाजाला वेगळे आरक्षण द्या'मराठा समाजाप्रमाणे देशभरातील जाट, राजपूत, रेड्डी आदी क्षत्रिय समाजाला वेगळे आरक्षण द्यावे. देशभरातील गरीब क्षत्रियांना ज्यांचे उत्पन्न 8 लाखांपर्यंत आहे, अशा क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे 12 टक्के आरक्षण द्यावे, अशी माझी मागणी असून त्याबाबतचे विनंती पत्र आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविणार आहोत. क्षत्रिय समाजातील गरिबांना वेगळे आरक्षण दिल्यास मराठा समाजाला त्यातून आरक्षण मिळेल असे रामदास आठवले म्हणाले.

(मराठा मुख्यमंत्री असता तर न्यायालयाचा हा निर्णय अपेक्षित नसता - नारायण राणे)

'नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणे गरजेचे आहे'सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा अधिक वाढविता येत नाही, असे मत व्यक्त केले आहे. मात्र ते केवळ न्यायालयाचे मत आहे कायदा नाही तसेच संविधानाचीही तशी गाईडलाईन नाही. त्यामुळे सवर्ण गरिबांसाठी 10 टक्के आरक्षणाचा कायदा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला असून आरक्षण आता 59. 50 टक्के झाले आहे. त्यामुळे मराठा समाजाला 10 ते 12 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मंजूर व्हायला पाहिजे होता. मराठा समाजात 70 टक्के पेक्षा जास्त संख्येने गरीब आहेत. त्यांना नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देणे गरजेचे आहे, असे रामदास आठवले यांनी सांगिले.

(केंद्र सरकारने मराठा आरक्षणाला मान्यता मिळवून द्यावी - नवाब मलिक)

नरेंद्र मोदी यांना साकडे घालणार राज्य सरकार ने मराठा समाजाला आवश्यक असणाऱ्या आरक्षणाची बाजू योग्य पद्धतीने मांडली नसल्यानेच मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. आता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी भारत सरकार मध्ये आपण प्रयत्न करणार आहोत. क्षत्रिय मराठा समाजातील गरिबांना आपण आरक्षण मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साकडे घालणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले. 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेMaharashtraमहाराष्ट्रMaratha Reservationमराठा आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय