किरीट सोमय्या यांना एकदाच शिवसेना स्टाइल उत्तर देऊ, अनिल परब यांचा इशारा

By बाळकृष्ण परब | Published: November 13, 2020 02:31 PM2020-11-13T14:31:59+5:302020-11-13T14:33:39+5:30

Anil Parab News : गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपामधील संबंध कमालीचे टोकाला गेले आहे. त्यातच आता अर्णब गोस्वामी प्रकरणावरून भाजपाचे नेते शिवसेनेला सातत्याने लक्ष्य करत असल्याने आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे.

Let's give Shiv Sena style answer to Kirit Somaiya once, Anil Parab's warning | किरीट सोमय्या यांना एकदाच शिवसेना स्टाइल उत्तर देऊ, अनिल परब यांचा इशारा

किरीट सोमय्या यांना एकदाच शिवसेना स्टाइल उत्तर देऊ, अनिल परब यांचा इशारा

Next
ठळक मुद्देकिरीट सोमय्या यांनी सुरी केलेली आरोपांची मालिका आधी संपू द्यामग आम्ही त्या आरोपांची चिरफाड करू दिवाळीचे हे चार दिवस संपू द्या मग त्यांना एकदाच शिवसेना स्टाइलने उत्तर दिले जाईल

मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपामधील संबंध कमालीचे टोकाला गेले आहे. त्यातच आता अर्णब गोस्वामी प्रकरणावरून भाजपाचे नेते शिवसेनेला सातत्याने लक्ष्य करत असल्याने आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. थेट ठाकरे कुटुंबीयांनाच लक्ष्य करत असलेल्या किरीट सोमय्या यांना राज्य सरकारमधील मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी रोखठोक इशारा दिला आहे. सातत्याने राळ उडवत असलेल्या किरीट सोमय्या यांच्या आरोपांची मालिका संपूद्या मग आम्ही एकदाच त्यांना शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ असा इशारा अनिल परब यांनी दिला आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांना आज पुन्हा एकदा ठाकरे कुटंबावर टीकेची राळ उडवल्यानंतर अनिल परब यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी सुरी केलेली आरोपांची मालिका आधी संपू द्या. मग आम्ही त्या आरोपांची चिरफाड करू. दिवाळीचे हे चार दिवस संपू द्या मग त्यांना एकदाच शिवसेना स्टाइलने उत्तर दिले जाईल. तसेच आता आम्ही जे आरोप करू ते सहन करण्याची तयारीही त्यांनी ठेवली पाहिजे.

दरम्यान, ह्लहिंमत असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आरोपांना उत्तर द्यावंह्व; असं आव्हान किरीट सोमय्यांनी शिवसेनेला दिलं आहे. मुंबईच्या भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या म्हणाले की, ठाकरे सरकार भूखंडाचं श्रीखंड करणारं सरकार आहे. दहिसर येथील जमीन एका बिल्डरने २ कोटी ५५ लाखात घेतली आणि मुंबई महापालिका ९०० कोटीत ती जमीन विकत घेत आहे. मुलुंड येथे ५ हजार खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी २२ एकर जमीन खरेदी करण्याच्या व्यवहाराची चौकशी करण्यात यावी याबाबत मी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली होती. राज्यपालांनी सुमोटो अधिकारातंर्गत तपास करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले आहेत. दिवाळीपूर्वी ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढणार हे आश्वासन दिले होते, ते मी पाळले. यावर संजय राऊत काहीही बोलायला तयार नाहीत. या व्यवहारांवर हिंमत असेल तर शिवसेनेच्या कोणत्याही प्रवक्त्यांनी भाष्य करावे असं त्यांनी सांगितले.
तसेच अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे कुटुंबाचे संबंध काय? आणखी ९ सातबारा देणार आहे, ३० जमिनीचे व्यवहार उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी केले आहेत. आतापर्यंत रश्मी ठाकरेंनी जाहीर केलेले ४० जमीन व्यवहार झालेत त्यातील ३० व्यवहार अन्वय नाईक कुटुंबासोबत झाली, या सातबाऱ्यावर ही जमीन लागवडीसाठी योग्य नाही असं लिहिलंय, शिवसेनेत हिंमत नाही म्हणून यावर बोलणार नाही, माझ्या ५ प्रश्नांची उत्तर द्या. नाईक कुटुंबांशी ठाकरे संबंधित आर्थिक संबंध काय? हे महाराष्ट्राच्या जनतेला जाणून घ्यायचं आहे. हे सांगावे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबत उत्तर द्यावं, जमीन कशासाठी घेतली? रवींद वायकरांसोबत आर्थिक भागीदारी आहे का? या प्रश्नांची उत्तरं देण्याची हिंमत नाही असा टोला किरीट सोमय्या यांनी शिवसेनेला लगावला.

ह्लकिरीट सोमय्या महाभारतातील शिखंडीह्व; भ्रष्टाचाराच्या आरोपावरून शिवसेना नेत्यांचा पलटवार
 किरीट सोमय्या यांच्या आरोपावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी घणाघात केली. त्या म्हणाल्या की,  किरीट सोमय्यांनी आरोप केले म्हणजे मी आरोपी होत नाही, किरीट सोमय्यांना केवळ आरोप करण्यासाठी नेमलं आहे. कुठलीही जनहित याचिका केली आम्ही त्या सगळ्यांना सामोरं जायला तयार आहोत, त्यांनी आरोप केले त्यावर उत्तर देत बसणार नाही, आम्हाला आमची कामं करून द्यावीत, आरोप करताय ते सिद्ध करावं, दरवेळी आरोप करत बसायचे हे लोकशाहीला धरून नाही. सोमय्या हे महाभारतातले शिखंडी आहेत. उच्च न्यायालयात आम्ही रितसर कागदपत्रे दाखवू. किरीट सोमय्यांच्या मागे लागण्याची गरज नाही. जे आरोप केले ते सिद्ध करावं असं आव्हान त्यांनी दिलं.

Web Title: Let's give Shiv Sena style answer to Kirit Somaiya once, Anil Parab's warning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.