शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
2
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
3
ममता बॅनर्जींनी पश्चिम बंगाल गमावला! संजय राऊत राहुल गांधींना म्हणाले, "जागे व्हा, आता आपण..."
4
प्रेयसीच्या भावावर सूड उगवण्यासाठी दीड वर्षाच्या चिमुरडीचा काटा काढला; १३ वर्षांनंतर न्याय मिळालाच!
5
हाय राईज बिल्डिंगमध्ये फ्लॅट घ्यायचे स्वप्न... नजारा काय दिसतो...; पण लाईट गेली की, धक्कादायक वास्तव
6
पाकिस्तानचा प्रसिद्ध मौलाना इदरीस तरंगजईची गोळ्या झाडून हत्या; दोन पोलीस गंभीर
7
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
8
भाजपचा बंगालमध्ये ऐतिहासिक विजय! मुख्यमंत्रीपदासाठी ४ नावांची चर्चा; शपथविधी सोहळ्याची मोठी तयारी
9
लग्नाच्या प्रश्नांना अन् दडपणाला कशी सामोरी जातेस? प्राजक्ता माळी म्हणाली, "जे तुमचं असतं..."
10
भीषण, भयंकर, भयावह! चीनमध्ये फटाक्याच्या फॅक्ट्रीत मोठा स्फोट; २१ जणांचा मृत्यू, ६१ जखमी
11
चिनी नागरिक स्वत:ला नेपाळी भासवत होता, नेपाळी नंबरची स्कूटर घेऊन भारतात घुसला अन्...
12
LNG Supply: कतारकडून पुरवठा थांबला, भारतानं कंबर कसली; ७ नव्या टाक्यांचा 'यासाठी' उपयोग होणार, काय आहे संपूर्ण प्लॅन
13
तिघांनी हल्ला केला, कोयता डोक्यात अडकला; सायन रुग्णालयातील थरारक व्हिडिओ, तो तरुण नेमका कोण?
14
Adhik Maas 2026: तब्बल ११ वर्षांनंतर दुर्मिळ योग! अधिक मासात सुख समृद्धीसाठी 'या' तीन गोष्टींचे करा दान!
15
ब्राझीलमध्ये विमान थेट इमारतीला धडकले; अपघाताचा थरारक Video आला समोर, ३ जण दगावले
16
लग्नाच्या पहिल्या वाढदिवसापूर्वीच संसार उद्ध्वस्त; शेजारणीवर जीव जडला, बायकोचा काटा काढला
17
‘सरकारने कुठलाही विचार न करता या आरोपीला हालहाल करून संपवावं’, नसरापूर प्रकरणी राज ठाकरेंचा रोखठोक सल्ला
18
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
19
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
20
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Khadse : तुमच्यासोबत किती आमदार, खासदार भाजप सोडणार; एकनाथ खडसेंनी सांगितला आकडा

By बाळकृष्ण परब | Updated: October 21, 2020 15:09 IST

Eknath Khadse News : भाजपा सोडणाऱ्या खडसेंसोबत त्यांचे समर्थक असलेले किती आमदार आणि खासदार जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जळगाव - भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गेल्या अनेक दिवसांच्या नाराजीनंतर आज अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. खडसेंनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेशाची घोषणा केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. दरम्यान, भाजपा सोडणाऱ्या खडसेंसोबत त्यांचे समर्थक असलेले किती आमदार आणि खासदार जाणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, आपल्यासोबत किती आमदार, खासदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत याची माहिती खुद्द एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली आहे.खडसे म्हणाले की, भाजपावर आणि भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वावर नाराज नाही. माझी नाराजी केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांच्यामुळेच मी पक्ष सोडत आहे. मी येत्या शुक्रवारी राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत किती आमदार, खासदार आहेत असे विचारले असता खडसे यांनी सांगितले की, माझ्यासोबत एकही आमदार किंवा खासदार नाही. मी एकटाच राष्ट्रवादी कांग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. रक्षा खडसे ह्या भाजपामध्येच राहणार आहेत.दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून नाराज असलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, खडसे हे शुक्रवारी २३ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशाबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत अधिकृतरीत्या घोषणा केली आहे.मुंबईत २३ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता शरद पवारांच्या उपस्थितीत एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार आहे. सांगितलं जात आहे. एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती.

 

 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणeknath khadseएकनाथ खडसे