शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-राष्ट्रवादी मंत्र्यांमध्ये कुरघोडी; उदय सामंतांविरोधात जितेंद्र आव्हाडांची तीव्र शब्दात नाराजी

By प्रविण मरगळे | Updated: January 14, 2021 10:42 IST

मंत्री उदय सामंत यांनी अशाप्रकारे कोणतीही बैठक बोलावली नसल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे असं स्पष्टीकरण दिलं.

ठळक मुद्देमला कोणतीही कल्पना न देता माझ्या खात्याबाबत बैठक बोलावल्याचं मला कळालंकिमान माझ्या खात्याशी संबंधित बैठक घेताना मंत्र्यांनी मला कळवायला हवं होतंकोणताही मंत्री इतर खात्याच्या बैठका संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीविना घेऊ शकणार नाही

मुंबई – राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या तिन्ही पक्षाचं मिळून महाविकास आघाडीचं सरकार आहे. परंतु सरकारमधील मंत्र्यांमध्ये एकमेकांविरोधात नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. म्हाडाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान सरकारमधील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात सध्या वाद सुरु झाला आहे. जितेंद्र आव्हाडांना कोणतीही कल्पना न देता गृहनिर्माण खात्याची बैठक उदय सामंत यांनी बोलवल्याने या वादाला तोंड फुटलं आहे.

यासंदर्भात जितेंद्र आव्हाडांनी(Jitendra Awhad) मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना तीव्र शब्दात याचा विरोध केला आहे. प्रोटोकॉलनुसार एखाद्या खात्याच्या मंत्र्याला स्वत:च्या खात्याबाबत बैठक घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु उदय सामंत यांनी मला कोणतीही कल्पना न देता माझ्या खात्याबाबत बैठक बोलावल्याचं मला कळालं, किमान माझ्या खात्याशी संबंधित बैठक घेताना मंत्र्यांनी मला कळवायला हवं होतं. अशा वागणुकीमुळे गैरसमज निर्माण होतात. एकमेकांना माहिती दिली तर आम्ही एकत्रित आणि निर्णायक पद्धतीने काम करू शकतो असं त्यांनी सांगितले.

तर मंत्री उदय सामंत(Uday Samant) यांनी अशाप्रकारे कोणतीही बैठक बोलावली नसल्याचं सांगत जितेंद्र आव्हाडांचा काहीतरी गैरसमज झालेला आहे असं स्पष्टीकरण दिलं. मागील भाजपा-शिवसेना सरकारच्या काळात तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी उद्योगमंत्र्याच्या परवानगीशिवाय पुण्यातील एमआयडीसीच्या जागेसंदर्भात बैठक बोलावली होती. त्यावेळी जमिनीमालकाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश खडसेंनी अधिकाऱ्यांना दिले होते, त्यानंतर हे प्रकरण खूप गाजलं होतं.

एकनाथ खडसेंच्या या प्रकरणानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय परिपत्रक काढत प्रोटॉकोल पाळण्याचे आदेश दिले तसेच कोणताही मंत्री इतर खात्याच्या बैठका संबंधित मंत्र्यांच्या उपस्थितीविना घेऊ शकणार नाही असंही म्हटलं होतं. महाविकास आघाडी सरकारमधील वाद राज्यातील जनतेला नवा नाही, कधी काँग्रेसचं शिवसेनेसोबत तर शिवसेना विरूद्ध राष्ट्रवादी अशी नाराजीची मालिका सुरूच असते. औरंगाबादचं नामांतरण असो वा कृषी कायद्याच्या अंमलबजावणी तर कधी पोलीस खात्यातील बदल्यांमुळे प्रत्येक मुद्द्यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचं समोर आलं आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडUday Samantउदय सामंतDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसeknath khadseएकनाथ खडसे