शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जगात मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी काँग्रेसचे टूल किट; भाजपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2021 07:13 IST

काँग्रेसचा इन्कार; भाजप कटकारस्थान करीत आहे

नवी दिल्ली : देशात सापडणाऱ्या विषाणूला ‘भारतीय स्ट्रेन’किंवा ‘मोदी स्ट्रेन’असे संबोधण्याचे कथित टूल किट जारी करून काँग्रेस जगभरात देशाची आणि विशेषत: पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा मलिन करू पहात आहे, असा आरोप भारतीय जनता पार्टीने मंगळवारी केला. परंतु काँग्रेसने हे टूल किट बनावट असल्याचा सांगत याचा इन्कार केला आहे.

भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीट केले की, देशात कोरोना महामारीचे संकट असताना राहुल गांधी मात्र या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा मलिन करण्याची संधी शोधत आहेत, ही अतिशय शरमेची बाब आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देशातील कोरोना विषाणूला मोदी स्ट्रेन म्हणा, असे सांगितले जात आहे. टूल किटचा हवाला देत पात्रा यांनी म्हटले आहे की, काही परदेशी पत्रकारांच्या मदतीने काँग्रेस भारताची प्रतिमा मलिन करू पहात आहे. 

भाजप नेत्यांवर गुन्हे दाखल करणारकाँग्रेसच्या रिसर्च विभागाला हे टूल किट बनावट असल्याचे आढळले आहे असे स्पष्ट करून पक्षाने या आरोपांचा साफ इन्कार केला आहे. पक्षाच्या वतीने केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, देशातील जनतेला कोरोनापासून वाचविण्याऐवजी आपल्या सरकारला विरोधी पक्षांची बदनामी करण्यात अधिक रस आहे. काँग्रेसच्या रिसर्च विभागाचे प्रमुख राजीव गौडा यांनी ट्विट केले की, देशातील नागरिकांना कोरोनाच्या संकटातून दिलासा देण्याऐवजी भाजप लज्जास्पदपणे कटकारस्थाने करीत आहे. आम्ही जे. पी. नड्डा आणि संबित पात्रा यांच्याविरोधात बनावट कागदपत्रे तयार करण्याबाबत गुन्हा दाखल करणार आहोत.

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेस