शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी महाराज आमचं आराध्यदैवत, पण...; थोरातांनी सांगितलं नामांतरामागचं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2021 19:18 IST

औरंगाबादच्या नामांतराचा विषय तापला असताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी स्पष्ट केली भूमिका

ठाणे : औरंगाबादचे संभाजीनगर या विषयावर चर्चा करण्याचे कारण नाही. त्यासाठीच्या आमच्या भूमिका स्पष्टपणे मांडल्या आहेत. त्यातच महाराजांच्या नावाला विरोध नसून ते आमचे आराध्यदैवत आणि श्रध्दा स्थान. काही विषय असे असतात की त्यातून काही वेगळी वातावरण निर्मिती होऊ नये असे, आमचे धोरण आहे.  महाराज आमचे आराध्यदैवत आहे, असे मत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले. ठाण्यात ते आले असता काँग्रेसच्या कार्यालयास त्यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.  महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. आम्हाला आपला पक्ष वाढवण्याची संधी आहे. परंतु त्याबरोबर भाजपाची विचार सरणी आणि कार्यपद्धती मान्य नाही.त्यामुळे आम्ही आमचा पक्ष वाढवत आहोत त्याचवेळी आम्ही महाविकास आघाडीत आहेत. आम्ही प्रत्येक वेळी योग्य पद्धतीने चर्चा करुन निर्णय घेऊ आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेऊ असेही थोरात यांनी सांगितलं.   माझ्याकडे तीन महत्त्वाचे पदे आहेत. त्यामुळे सहाजीकच एकाचकडे या तीन पदाचा कोणालाही हेवा वाटणारा आहे. पक्षश्रेष्ठींना वाटले तर ते यात विभाजन करु शकता. ते अनेकांना संधी देऊ शकता. त्यासाठी मी सुद्धा तयार आहे, की तरुण मंडळींना संधी द्या आणि नवे नेतृत्व घडवा,  असेही थोरात यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या खांदेपालटाविषयी बोलताना स्पष्ट केले. येथील शासकीय विश्रामगृहात आल्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी वैदेही रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील आदींनी त्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी स्थानिक मुद्यांवर ओझरती चर्चा केली. त्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुतळ्यांवर चर्चा झाली. दरम्यान या पुतळ्यासाठी ठाणे महापालिकेने अर्थसंकल्पात चर केल्याचे यावळी कार्यकर्त्यांनी लक्षात आणून दिले. यावेळी या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस व माजी आमदार मोहन जोशी,मनोज शिंदे, शहर काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे,प्रदेश काँग्रेस सदस्य राजेश जाधव, सुरेश पाटीलखेडे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना