शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! पक्षाच्या अध्यक्षपदावरुन हटवलं, चिडलेल्या चिराग पासवानांनी पाचही खासदारांना पक्षातून हाकललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 17:56 IST

बिहारच्या राजकारणात सध्या खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे नेते (LJP) आणि खासदार चिराग पासवान यांना आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटविण्यात आलं आहे.

बिहारच्याराजकारणात सध्या खूप मोठ्या घडामोडी घडत आहेत. लोकजनशक्ती पक्षाचे नेते (LJP) आणि खासदार चिराग पासवान यांना आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटविण्यात आलं आहे. चिराग पासवान यांचे काका पशुपती पारस यांनी चिराग यांना पक्षातून बाहेरचा रस्त दाखवला आहे. लोकजनशक्ती पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी चिराग पासवान यांना डच्चू देत पशुपती पारस यांना पाठिंबा देत नेतेपदी निवड केली होती. 

दुसरीकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यपदावरुन हटविण्यात आल्यानं चिडलेल्या चिराग पासवान यांनी बंडखोरी करणाऱ्या पाचही खासदारांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर चिराग पासवान यांना आता राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन हटविण्यात आल्यानंतर त्यांना विरोधी पक्षांकडून ऑफर येण्यास सुरुवात झाली आहे. काँग्रेस आणि लालू प्रसादर यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाकडून चिराग पासवान यांना पक्षात सामील करुन घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. 

एनडीएची साथ सोडून तुम्ही आमच्यासोबत या आणि विरोधी पक्षांचा आवाज बुलंद करा, अशी थेट ऑफर राजदकडून चिराग पासवान यांना देण्यात आली आहे. आता चिराग पासवान नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 

'राजद'च्या आमदारानं सांगितलं राजकीय 'गणित'  राष्ट्रीय जनता दलाचे आमदार भाई बिरेंद्र यांनी चिराग पासवान यांच्यासमोर एक अनोखी ऑफर ठेवली आहे. चिराग पासवान यांनी तेजस्वी यादव यांच्यासोबत यावं आणि त्यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा द्यावा. सध्याची परिस्थिती दोन युवा नेत्यांनी एकत्र येण्याची आहे. तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री होण्यासाठी मदत करुन चिराग पासवान यांनी केंद्रात राहून दिल्लीतलं राजकारण सांभाळावं, अशी ऑफर राजद आमदार भाई बिरेंद्र यांनी दिली आहे. 

पशूपती पारस यांच्या बंडखोरीनं चिराग पडले एकटेलोकजनशक्ती पक्षाच्या (एलजीपी) बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड केलेले पशूपतीकुमार पारस हे पक्षनेते चिराग पासवान यांचे वडील आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू आहेत. बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड करताच पारस यांनी ‘मी पक्ष फोडलेला नाही, तर वाचवला आहे’, अशी प्रतिक्रिया पत्रकारांकडे व्यक्त केली होती. पारस हे हाजीपूरचे खासदार आहेत. या बंडानंतर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा केली.

टॅग्स :BiharबिहारPoliticsराजकारणLalu Prasad Yadavलालूप्रसाद यादव