शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

"ज्यांचं आयुष्य गांधी घराण्याच्या दबावाखाली गेलं त्या काँग्रेसला..."; केशव उपाध्ये यांचा जोरदार निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 7:55 PM

Tweet Inquiry : बालिश मागणीला गृहमंत्र्यांकडून होकार मिळणं दुर्देवी, उपाध्ये यांचं वक्तव्य

ठळक मुद्देबालिश मागणीला गृहमंत्र्यांकडून होकार मिळणं दुर्देवी, उपाध्ये यांचं वक्तव्यसेलिब्रिटींच्या ट्वीटची चौकशी करण्याचे गृहमंत्र्यांनी दिले आदेश

केंद्र सरकारनं केलेल्या नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनाला आंतरराष्ट्रीय पॉपस्टार रिहाना, ग्रेटा थनबर्ग, मिया खलिफा यांनी पाठिंबा देणारं ट्वीट केलं होतं. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अक्षय कुमार यासारख्या सेलिब्रिटींनी ट्वीट करत तिला प्रत्युत्तर दिले होते. या सर्व सेलिब्रिटींच्या ट्वीटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्यानं याची चौकशी करण्यात येणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं होतं. यानंतर अनेक स्तरातून याचा विरोध करण्यात येत आहे. भाजप महाराष्ट्राचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी जोरदार टीका केली. "सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांसारख्या भारतरत्नांची चौकशी करण्याचा आदेश देणे म्हणजे सरळ सरळ पोलीस यंत्रणेचा गैरवापर आहे. ज्यांचं आयुष्य गांधी घराण्याच्या दबावाखाली गेलं त्या काँग्रेसला सगळेच दबावाखाली असतात असं वाटणं स्वाभाविक आहे. पण या बालिश मागणीला गृहमंत्री होकार देतात ते दुर्दैवी आहे," असं म्हणता उपाध्ये यांनी सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून सरकारवर निशाणा साधला. सचिन सावंतांकडून मागणीदरम्यान, आज राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी काँग्रेसच्या शिष्टमंडळाची ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सेलिब्रिटींच्या ट्वीटच्या चौकशी करण्याची मागणी केली होती. एकाच वेळी सेलिब्रिटीजने ट्विट करण्यामागचे कारण काय? त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? या सेलिब्रिटजचा बोलविता धनी कोण आहे? या सर्व प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली होती. यावर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की, ही बाब गंभीर आहे. त्याचा तपास झाला पाहिजे. याबाबतची जबाबदारी गुप्तचर खात्याला दिली आहे. तसंच, सर्व सेलिब्रिटींचे ट्वीट एकसारखे कसे काय असू शकतात. त्यांच्यावर कुठला दबाव होता का? असा सवालही अनिल देशमुख यांनी उपस्थित केला. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार शेतकरी आंदोलनाबाबत भारतीय सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याची शक्यता आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBJPभाजपाMaharashtraमहाराष्ट्रTwitterट्विटरSachin Tendulkarसचिन तेंडुलकरLata Mangeshkarलता मंगेशकरAnil Deshmukhअनिल देशमुखcongressकाँग्रेसSachin sawantसचिन सावंत