Join us  

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 11:49 AM

गौरव मोरेने महाराष्ट्राची हास्यजत्रा शो सोडल्याचा धक्कादायक निर्णय चाहत्यांना सांगितलाय. यासाठी गौरवने सोशल मीडियावर लिहिलेली भावूक पोस्ट बघा (gaurav more, maharashtrachi hasyajatra)

गौरव मोरे हा सर्वांचा आवडता अभिनेता. गौरव मोरेने आजवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या माध्यमातून प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हास्यजत्रेत गौरव मोरेने साकारलेल्या विविध व्यक्तिरेखांना प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. पण आता अशी बातमी आलीय जी वाचून गौरवच्या चाहत्यांना नक्कीच धक्का बसेल. गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो सोडला आहे. हा मोठा निर्णय त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांना सांगितलाय.

गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सेटचा शेवटचा व्हिडीओ पोस्ट करत लिहिलंय की, "Hello everyone i am a gaurav more from powai filter padaTa na na na na naaaaaa आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची…… रसिक प्रेक्षक आपण ह्या साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत.."

गौरव मोरे पुढे लिहितो, "मला सांगताना खूप वाईट वाटतय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधुन आपला निरोप घेत आहे.माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील ! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे."

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्रामराठीमराठी अभिनेता