शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2024 11:12 AM

1 / 9
ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिना अनेकविध कारणांमुळे विशेष ठरणारा आहे. वृषभ राशीत चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. मे महिन्यात वृषभ राशीत गुरु, सूर्य, बुध आणि शुक्र हे चार ग्रह असणार आहेत. या ग्रहांच्या वृषभ राशीतील गोचरामुळे विविध प्रकारचे अत्यंत शुभ मानले गेलेले योग जुळून येणार आहेत.
2 / 9
विशेष म्हणजे मे महिन्यात गुरु आणि शुक्र हे दोन ग्रह अस्तंगत होणार आहेत. काही मान्यतांनुसार, गुरु आणि शुक्र हे एकमेकांचे शत्रू ग्रह आहेत. एखादा ग्रह सूर्यापासून जवळच्या अंशांवर असतो, तेव्हा तो ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. पृथ्वीवरून हा ग्रह दिसत नसल्याने या स्थितीला तो ग्रह अस्त पावला, असे समजले जाते. सूर्यापासून दूरच्या अंतरावरून ग्रह मार्गक्रमण करू लागला की, तो ग्रह पृथ्वीवरून दिसतो. त्यामुळे त्या ग्रहाचा उदय झाला, असे सांगितले जाते.
3 / 9
वृषभ राशीत गुरु आणि शुक्रासोबत सूर्य असल्याने हे दोन्ही ग्रह अस्तंगत होत आहेत. ३ जून रोजी गुरु ग्रहाचा उदय होणार असून, ७ जुलै रोजी शुक्र ग्रहाचा उदय होणार आहे. गुरु आणि शुक्र अस्तंगत असल्याचा काही राशींना लाभ होणार आहे, तर काही राशींना आगामी काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...
4 / 9
मेष: जीवनात सकारात्मक परिणाम होऊ शकेल. व्यवसायात फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे तर ते चांगले होणार आहे. यासोबतच परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत अनावश्यक खर्च करावा लागू शकतो. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. आरोग्य चांगले राहील.
5 / 9
वृषभ: करिअरशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. छोट्या कामासाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. याशिवाय वरिष्ठांशी संबंध बिघडू शकतात. सहकाऱ्यांच्या अडथळ्यांनाही सामोरे जावे लागू शकते. तणावात राहू शकता. व्यवसायात लाभाची शक्यता कमीच आहे. वाढत्या खर्चामुळे त्रस्त व्हाल. बचतीच्या योजना यशस्वी होतीलच असे नाही. लव्ह लाइफमध्येही समस्या उद्भवू शकतात.
6 / 9
सिंह: मुलांच्या यश, प्रगती, विकासाबद्दल चिंतित असू शकतात. कामाच्या संदर्भात खूप प्रवास करावा लागू शकतो. यातून कोणताही फायदा मिळण्याची शक्यता दिसत नाही. ध्येय साध्य करण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील. नोकरी करणारे लोक कामात समाधानी नसल्यामुळे पुन्हा नोकरी सोडू शकतात. व्यवसायात अपयश येण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत काही मुद्द्यावरून मतभेद होऊ शकतात. आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागू शकते.
7 / 9
कन्या: नवीन मित्र बनवण्याची संधी मिळेल. करिअर क्षेत्रात काही अडचणी आल्या तरी त्यावर सहज मात करू शकाल. मेहनतीचे आणि समर्पणाचे फळ मिळू शकते. कामाबद्दल कौतुक होऊ शकते. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती चांगली राहू शकेल. बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.
8 / 9
वृश्चिक: गुरु आणि शुक्र अस्तंगत होणे अनुकूल ठरेलच असे नाही. नशिबाची साथ मिळणार नाही. छोट्या कामांसाठी जास्त मेहनत करावी लागू शकते. व्यवसायातही चांगले परिणाम मिळतीलच असे नाही. आर्थिक नुकसान होऊ शकते. भागीदारीत केलेल्या व्यवसायात अडचणी येऊ शकतात. जोडीदारासोबत चांगला ताळमेळ राहीलच असे नाही.
9 / 9
मकर: विशेष लाभ मिळू शकतो. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकेल. आनंदी आणि समाधानी राहू शकता. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा. काम चांगले होईल, सर्वजण तुमचे कौतुक करतील. वरिष्ठ अधिकारीही कामाने प्रभावित होतील. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर काही अडचणी येऊ शकतात. पण गुरुकृपेमुळे लाभही मिळू शकतो. नात्यात परस्पर समंजसपणा असल्यास नाते घट्ट होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य