Join us  

IPL 2024 SRH vs PBKS : पंजाबच्या नवीन कर्णधारानं टॉस जिंकला; टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याचे SRHसमोर आव्हान

IPL 2024 SRH vs PBKS Live Match : आज सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 3:06 PM

Open in App

SRH vs PBKS Live Score Updates । हैदराबाद : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील ६९ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. पाहुण्या पंजाबसाठी आजचा सामना म्हणजे केवळ औपचारिकता आहे. तर यजमान हैदराबादने आजचा सामना जिंकल्यास त्यांना दोन गुण मिळतील... शिवाय टॉप-२ मध्ये स्थान मिळवण्याची संधी देखील असणार आहे. सनरायझर्स हैदराबादचा संघ १३ सामन्यांत ७ विजय आणि १५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून आजच्या सामन्यातील विजय त्यांना अव्वल २ मध्ये घेऊन जाईल. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम हैदराबाद येथे आजचा सामना खेळवला जात आहे. (IPL 2024 News) 

आजच्या सामन्यासाठी पंजाब किंग्सचा कर्णधार जितेश शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅम करन मायदेशी परतल्यामुळे जितेश शर्मा आज पंजाबच्या संघाचे नेतृत्व करत आहे. विशेष बाब म्हणजे राइली रूसो हा एकमेव परदेशी खेळाडू पंजाब किंग्सच्या संघात खेळत आहे. आज यानंतरच्या सामन्यात जर राजस्थान रॉयल्सला KKR ने हरवले तर KKRचा सामना पहिल्या क्वालिफायरमध्ये SRHशी होऊ शकतो. दुसरीकडे, पंजाब किंग्स १३ सामन्यांत ५ विजयांसह नवव्या स्थानावर आहे आणि या सामन्यातील विजयासह ते आठव्या स्थानासह ते स्पर्धेचा शेवट करू शकतात.

हैदराबादचा संघ -पॅट कमिन्स (कर्णधार), अभिषेक शर्मा, राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन, नितीश रेड्डी, अब्दुल समद, शाहबाज अहमद, सनवीर सिंह, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, वी विजयकांत. 

पंजाबचा संघ -जितेश शर्मा (कर्णधार), राइली रूसो, प्रभसिमरन सिंह, अथर्व तायडे, शशांक सिंह, शिवम सिंह, आशुतोष शर्मा, ऋषी धवन, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर, हर्षल पटेल. 

टॅग्स :सनरायझर्स हैदराबादआयपीएल २०२४पंजाब किंग्स