Join us  

RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सलग सहा विजयांची नोंद करून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2024 12:25 AM

Open in App

IPL 2024, RCB vs CSK Live Marathi : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये सलग सहा विजयांची नोंद करून प्ले ऑफमध्ये प्रवेश केला. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात RCB ने उत्तम सांघिक खेळ केला.  बंगळुरूने ( 0.459) विजय मिळवून नेट रन रेटच्या जोरावर प्ले ऑफचे तिकीट पक्के केले. रचीन रवींद्रचा रन आऊट हा सामन्याला कलाटणी देणारा ठरला, त्यात RCB चा कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिसने अफलातून झेल  घेऊन सामन्याला निकाल निश्चित केला. 

विराट कोहली ( ४७) व फॅफ ड्यू प्लेसिस ( ५४) यांनी ७८ धावांची भागीदारी करून दिली. कॅमेरून ग्रीन व रजत पाटीदार यांनी २८ चेंडूंत ७१ धावा चोपल्या. पाटीदार २३ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४१ धावांवर झेलबाद झाला. दिनेश कार्तिक ( ६ चेंडूंत १४ धावा )  आणि ग्लेन मॅक्सवेल ( ५ चेंडूंत १६ धावा) यांनी झटपट धावा केल्या. ग्रीन १७ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ३८ धावांवर नाबाद राहिला आणि बंगळुरूने ५ बाद २१८ धावा केल्या. प्रत्युत्तरात, चेन्नईला ७ बाद १९१ धावाच करता आल्या आणि २७ धावांनी त्यांचा पराभव झाला. ग्लेन मॅक्सवेलने पहिल्याच चेंडूवर ऋतुराज गायकवाडची विकेट मिळवली. रचिन रवींद्र व अजिंक्य  ( ३३) यांनी ६६ धावांची भागीदारी केली. रचीन ३७ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ६१ धावांवर रन आऊट झाल्याने मॅच फिरली. त्यात १५व्या षटकात मिचेल सँटनरचा ( ३) अफलातून झेल घेऊन फॅफ ड्यू प्लेसिसने सामन्याचा निकाल निश्चित केला. CSK ला प्ले ऑफसाठी १२ चेंडूंत ३५ धावा करायच्या होत्या आणि जडेजा व महेंद्रसिंग धोनी ही अनुभवी जोडी मैदानावर होती. १९व्या षटकात दोघांनी १८ धावा चोपल्या आणि २७ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली. ६ चेंडूंत १७ धावा चेन्नईला प्ले ऑफच्या तिकीटासाठी हव्या होत्या. धोनीने पहिलाच फुलटॉस चेंडू ११० मीटर लांब षटकार खेचला. या पर्वातील हा सर्वात लांबचा षटकार ठरला.  पुढच्या चेंडूवर धोनी ( २३) उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात झेलबाद झाला. शार्दूल ठाकूर स्ट्राईकवर होता आणि एक डॉट बॉल गेल्याने ३ चेंडूंत ११ धावा हव्या होत्या. २ चेंडू १० धावा असताना जडेजा स्ट्राईकवर आला. पण, यश दयालने दोन डॉट बॉल टाकले. आणि चेन्नईला २७ धावांनी हरवले. चेन्नईला ७ बाद १९१ धावा करता आल्या. जडेजा २२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ४२ धावांवर नाबाद राहिला.  

टॅग्स :आयपीएल २०२४रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविराट कोहलीअनुष्का शर्माचेन्नई सुपर किंग्स