शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात कंपाऊंडर बनला डॉक्टर; भाजप नेते म्हणाले, "संजय राऊतांच्या विधानाचा प्रेरणास्त्रोत हाच असावा बहुधा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2021 17:36 IST

कंपाऊंडरनं सुरू केलं होतं २२ बेड्सचं रुग्णालय. रुग्णालयात सुरू होती कोरोनाबाधितांवर उपचार, धक्कादायक बाब आली समोर

ठळक मुद्दे कंपाऊंडरनं सुरू केलं होतं २२ बेड्सचं रुग्णालय.रुग्णालयात सुरू होती कोरोनाबाधितांवर उपचार, धक्कादायक बाब आली समोर

पुणे : जिल्ह्यातील शिरूर येथे धक्कादायक घटना घडली आहे. याठिकाणी कपाऊंडर बोगस डॉक्टर बनून २ वर्षापासून २२ बेडचं हॉस्पिटल चालवत होता. एवढंच नाही तर त्यानं कोविड रुग्णांसाठी स्पेशल वार्डही बनवला होता. ज्यात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. हा कंपाऊंडर डॉक्टरकीचं बनावट डिग्री आणि नावानं लोकांची फसवणूक करत असल्याचं उघड झालं आहे. दरम्यान, यावरुन भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टोला लगावला आहे. "पुणे जिल्ह्यात बनावट डिग्रीच्या मदतीने एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चालविण्याचा पराक्रम या दोन वर्षापासून एका कंपाऊंडरने केला. कोरोना रुग्णांवरदेखील त्या हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. संजय राऊतांच्या विधानाचा प्रेरणास्रोत हाच असावा बहुधा," असं म्हणत भातखळकर यांनी राऊतांना टोला लगावला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला.काय आहे प्रकरण?पोलिसांनी सांगितल्यानुसार, बनावट डिग्री आणि नावासह हे हॉस्पिटल गेल्या २ वर्षापासून सुरू होतं. ज्यावेळी आरोपीने एका व्यक्तीसोबत हॉस्पिटल चालवण्यासाठी पार्टनरशिप केली. तेव्हा दोघांमध्ये पैशावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडे पोहचलं. तेव्हा प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलिसांना या घटनेचा तपास सुरू केला, तेव्हा हा प्रकार उघडकीस आला.या आरोपीचं नाव मेहबूब शेख असं आहे. तो महेश पाटील नावानं बनावट डिग्री दाखवून मोरया हॉस्पिटल चालवत होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आरोपी नांदेडला राहणारा असल्याचं चौकशीत समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नांदेडमधील एका डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काम करत होता. त्यावेळी त्याने डॉक्टर म्हणून काम केलं. त्यानंतर त्याने बनावट हॉस्पिटल सुरू करण्याचा विचार केला आणि त्याच्या जोडीला त्याने आणखी एका सहकाऱ्याला घेतलं.या दोन्ही पार्टनरमध्ये पैशांवरून वाद सुरू झाला. त्यानंतर पोलिसांकडे हे प्रकरण पोहचल्यानं प्रकार उघडकीस आला. आरोपीच्या विरोधात फसवणूक आणि महाराष्ट्र वैद्यकीय अधिनियमातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. आरोपीने बोगस प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि हॉस्पिटल सुरू करण्यासाठी लागणारी इतर कागदपत्रेही बनवली होती. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAtul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाcorona virusकोरोना वायरस बातम्याPuneपुणे