शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
3
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
4
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
5
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
6
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
7
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
8
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
9
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
10
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
11
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
12
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
13
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
14
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
15
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
16
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
17
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
18
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
19
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
20
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट

भाजपाच्या बड्या नेत्याने घेतली शरद पवारांची भेट, फोटो शेअर करून सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 5:02 PM

आज भाजपाचा राज्यातील एक बडा नेता शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

ठळक मुद्देभाजपा नेते आशिष शेलार यांनी आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतलीया भेटीची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शेलारांसोबतचा फोटो शेअर करून दिली शेलार आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही

मुंबई - राज्यात एकीकडे कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली असताना दुसरीकडे राज्यातील राजकारणही विविध घडामोडींमुळे तापलेले आहे. त्यातच भाजपात गेलेले राष्ट्रवादीचे नेते लवकरच घरवापसी करतील असे विधान करून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी खळबळ उडवून दिली होती. अशा परिस्थितीतच आज भाजपाचा राज्यातील एक बडा नेता शरद पवार यांच्या भेटीला गेल्याने राज्यातील राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीची माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर शेलारांसोबतचा फोटो शेअर करून दिली. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. पण आशिष शेलार यांनी आज अचानक शरद पवार यांची भेट का घेतली. तसे शेलार आणि शरद पवार यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबतचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. काय म्हणाले होते नवाब मलिकराष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी सोमवारी सांगितले होते.नवाब मलिक  यांनी ट्विट करत ही माहिती दिली होती. त्यात ते म्हणाले होते की, राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही, असा दावा नवाब मलिक यांनी केला होता. तसेच यावर लवकरच निर्णय घेऊन सार्वजनिक जाहीर केले जाईल, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केले होते. तसेच काही आमदार शरद पवारांना, दादांना भेटून परत येण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून बोलत आहेत. कोणत्याही अटी-शर्ती नसतील त्यांनाच प्रवेश दिला जाईल, असंही नवाब मलिक यांनी यावेळी म्हटले होते.

इतर महत्त्वाच्या बातम्या

आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे बनवता येणार रेशन कार्ड, केवळ या कागदपत्रांची आवश्यकता

वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती

रक्षाबंधनाच्या मुहुर्तावर स्वस्तात सोने खरेदीची संधी, मोदी सरकारच्या या योजनेमुळे होणार सर्वसामान्यांची चांदी

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAshish Shelarआशीष शेलारBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारण