Join us  

ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 6:54 AM

ॲड. उज्ज्वल निकम हे जळगावचे असून, त्यांचा जन्म उच्चशिक्षित आणि वकिली वारसा असलेल्या कुटुंबात झाला आहे. विज्ञानाची पदवी संपादन केल्यानंतर जळगाव येथेच त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे.

मुंबई : मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदार संघातून महायुतीकडून निवडणूकीच्या रिंगणात उतरलेले ॲड. उज्ज्वल निकम यांनी शुक्रवारी वांद्रे येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात वाजतगाजत उमेदवारी अर्ज दाखल केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार ॲड. आशिष शेलार यांच्यासह महायुतीच्या कार्यकर्त्यांनी उज्ज्वल निकम यांच्या रॅलीत सहभाग घेतला असतानाच उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या निकम यांनी प्रतिज्ञापत्रात स्वत:च्या नावे जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून एकूण २७ कोटी ७० लाख ७१ हजार ९८३ रुपये संपत्ती नमूद केली आहे.

ॲड. उज्ज्वल निकम हे जळगावचे असून, त्यांचा जन्म उच्चशिक्षित आणि वकिली वारसा असलेल्या कुटुंबात झाला आहे. विज्ञानाची पदवी संपादन केल्यानंतर जळगाव येथेच त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले आहे.

जंगम मालमत्ता

            रोख रक्कम : ११,३५,७९५

            वाहन : ५,२७,४३३ रुपयांची हुंडाई कार

            सोने : १४,७१,६४० रुपये

            चांदी : २,५९,५०० रुपये मूल्य

            एकूण जंगम मालमत्ता - १७,४५,९५,००५ रुपये

स्थावर मालमत्ता

            पाथर्डी (नाशिक),

मंगरुळमध्ये अनुक्रमे ०.४९ एकर, १.४४ एकर शेतजमीन आहे. जमिनीचा बाजारभाव अनुक्रमे ९३ लाख, ५ लाख ६४ हजार आहे.

            नाशिकमध्ये तीन ठिकाणी साडेपाच कोटी रुपये मूल्याची अकृषी जमीन

            अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे : १०,२४,७६,९७८ एकूण मूल्य

            पत्नीच्या नावे माहीममध्ये मालमत्ता : ८,४६,११,९१० एकूण मूल्य

टॅग्स :उज्ज्वल निकमलोकसभा निवडणूक २०२४महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४