शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

"तोंड लपवायला जागा न उरल्याने गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, 'मास्क' लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी मौन सोडावे"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2021 1:30 PM

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Anil Deshmukh And Param Bir Singh : भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "एवढे दिवस तोंडावर "मास्क" लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन सोडावे!" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

मुंबई – माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर महिन्याला 100 कोटी वसुलींचे टार्गेट दिल्याचा धक्कादायक आरोप लावला होता. या प्रकरणी सिंग यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ही याचिका हायकोर्टात दाखल करण्यात आली. त्यावर आज सुनावणीवेळी हायकोर्टाने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी असे आदेश दिले आहेत. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर (Thackeray Government) जोरदार हल्लाबोल केला आहे. "एवढे दिवस तोंडावर "मास्क" लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन सोडावे!" असं म्हणत निशाणा साधला आहे. 

भाजपाचे नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील आघाडी सरकारचे पितळ पूर्णपणे उघडे पडलं असं म्हटलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे राज्यातील आघाडी सरकारचे पितळ पूर्णपणे उघडे पडले. तत्कालीन पोलीस आयुक्तांच्या तक्रारीवरुन विद्यमान गृहमंत्र्यांवर गुन्हा दाखल होण्याची वेळ यावी. यामुळे महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली. याला जबाबदार केवळ आणि केवळ ठाकरे सरकारच!" असं शेलार यांनी म्हटलं आहे. 

"आता तोंड लपवायला जागा न उरल्याने नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. तसेच एवढे दिवस तोंडावर "मास्क" लावून शांत बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता तरी मौन सोडावे!" असं देखील आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांच्या याचिकेवर सुनावणीवेळी या प्रकरणाचे सीबीआय चौकशीचे आदेश दिले असून 15 दिवसांत प्राथमिक चौकशी रिपोर्ट सादर करावा असं म्हटलं आहे. त्यामुळे आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. अनिल देशमुख हे गृहमंत्री असल्याने त्यांच्यावरील आरोपाची पोलीस निष्पक्षपणे चौकशी करू शकणार नाहीत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी असं जयश्री पाटील यांनी याचिकेत म्हटलं होतं.

काय आहे 100 कोटी वसुली प्रकरण?

सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेनुसार, अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे व अन्य पोलीस अधिकाऱ्यांना दरमहा १०० कोटी जमा करण्याचे टार्गेट दिले होते. हे पैसे बार, रेस्टॉरंट व अन्य आस्थापनांद्वारे कमावण्याची सूचना केली होती. तसेच पोलीस बदल्यांत आणि पोस्टिंगमध्येही भ्रष्टाचार होतो. तपासात राजकारण्यांचा हस्तक्षेप होत असल्याचे याचिकेत नमूद आहे. सरकारी वकिलांनी ही याचिका दाखल करून घेण्यावर आक्षेप घेतला. सिंग यांनी त्यांची बदली करण्यात आल्यानंतर याचिका दाखल केली. त्यांना आयुक्तपदावरून गृहरक्षक दलाची जबाबदारी दिल्याने त्यांनी ही याचिका दाखल केली, असे नमूद केले.

"हे ठाकरे सरकारचे पाप, दुर्दैवाने मुंबई पोलिसांचे एवढे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती"

भाजपा नेत्यांनी याआधीही ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला होता. "दुर्दैवाने एवढे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे" असं म्हणत आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जोरदार टीकास्त्र सोडलं होतं. "एका सामान्य नागरिकाचा खून, एक एपीआयला अटक, त्याच्या गाडीत नोटांची बंडल, नोटा मोजण्याचे मशीन, गाडीत नंबर प्लेटचा  खच...त्यावरून मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या... दुर्दैवाने ऐवढे मुंबई पोलिसांचे खच्चीकरण आणि बदनामी कधीच झाली नव्हती. ठाकरे सरकारचे हे पाप आहे!" असं आशिष शेलार यांनी म्हटलं होतं. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसCourtन्यायालयPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र